काय सांगता, झेंडू फुले आणि पाने आरोग्यासाठी फायदेशीर आहे

शुक्रवार, 12 मार्च 2021 (19:25 IST)
झेंडूचे फुल सौंदर्य वाढवतात.तसेच पूजेसाठी देखील वापरतो, हे अँटीफंगल गुणधर्माने समृद्ध आहे. परंतु आपल्याला माहीत आहे की झेंडू आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. कसे काय जाणून घ्या. 
 
1 त्वचेवरील जखमा बरे होतात - 
या फुलांचा वापर जळजळ, जखम आणि पुरळ सारख्या समस्यांवर उपचार करण्यासाठी केला जातो.हे त्वचेवरील सूज,लालसरपणा कोरडेपणा, संवेदनशीलता कमी करतो .पाकळ्यांना जखमेवर लावल्याने जळजळ कमी होते. मुरूम बरे करण्यासाठी मलम म्हणून हे फुले वापरतात. 
 
2 मधमाशी चावल्यावर-
मधमाशी चावली असेल तर त्याचे डंक काढण्यासाठी झेंडूचा फुलांचा वापर करतात.झेंडूची पाने बारीक करून मधमाशी चावलेल्या ठिकाणी लावा. वेदना कमी होऊन दुष्प्रभाव कमी होतो.
 
3 मासिक पाळीच्या वेदना कमी करतो-
झेंडूचे फुले मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या वेदनेसाठी फायदेशीर आहे. हे मासिकपाळीच्या वेळी होणाऱ्या पेटके कमी करण्यात मदत करतात. 
 
4 बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास फायदेशीर आहे- 
बद्धकोष्ठतेचा त्रासासाठी झेंडूच्या झाडाची पाने आणि काळीमिरी एकत्र वाटून घ्या.आणि पाण्यात हे मिसळा. हे पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.  
 
5 सर्दी-पडसं दूर करतो-
याचा फुलाचे अर्क प्यायल्याने खोकला,सर्दी पडसचा त्रास कमी होतो. 
 
6 टाचावरील भेगा दूर करतो- 
या पानाचा रस एखाद्या पेट्रोलियम जेल मध्ये मिसळून लावल्याने टाचांच्या भेगा नाहीशा होतात. 
 
7 दातांच्या दुखण्यात फायदेशीर-
झेंडूच्या पानाचा काढा बनवून गुळणे केल्याने दाताच्या वेदनेपासून आराम मिळते.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती