असं म्हणतात की मुलें हे देवाच रूप असतात. ते आपल्या सभोवताली पासून बरेच काही शिकतात. म्हणून त्यांना लहान पणा पासून त्यांना नेहमी चांगल्या सवयी लावाव्यात. जेणे करून त्या सवयी त्यांना आयुष्यात कामी येतील. आम्ही अशाच काही सवयीं बद्दल सांगत आहोत.ज्या मुळे ते चांगले माणूस बनतील आणि लोक त्यांची प्रशंसा करतील. चला तर मग जाणून घेऊ या.
* लहान -मोठ्यांचा आदर करा-
मुलांना आवर्जून हे शिकवा की आपल्या पेक्षा मोठे असलेले लोक -भाऊ,बहीण,नातेवाईक इत्यादींचा आदर करा.तसेच त्यांनी पण मुलांशी बोलताना सौजन्याने बोलावे. तसेच मुलांपेक्षा लहान असणाऱ्यांना देखील सांगावे की आपण देखील त्यांचा आदर करावा.
* सामायिक करणे शिकवा-
मुलांना नेहमी कोणतीही गोष्ट सामायिक करायला शिकवावे. वस्तूंना सामायिक केल्याने आपसातील प्रेम वाढते. वस्तूंना सामायिक करणे ही चांगले माणूस असल्याचे दर्शवते.घरात असो किंवा बाहेर असो वस्तूंना सामायिक केल्याने नातं देखील दृढ होतात.मग ते नातं भाऊ-बहिणीचे असो, मित्राचे असो किंवा इतर कोणी असो. घरात असो, सहलीला असो,शिकवणी च्या ठिकाणी असो, शाळेत असो,वस्तूंना सामायिक करावे.