अरे वा ! जुन्या छत्रीचा वापर असा देखील होऊ शकतो.

बुधवार, 10 मार्च 2021 (09:30 IST)
आपण बऱ्याच वेळा घरात काहीही तुटले की लगेच फेकून देतो अशा प्रकारे एक खूपच सामान्य वस्तू आहे छत्री. जी प्रत्येकाच्या घरात आढळते. प्रत्येक वस्तूचे देखील आयुष्य आहे.काळांतरानंतर ती वस्तू तुटून जाते. नंतर ती वस्तू आपण बाहेर फेकून देतो.वस्तू तुटल्यावर फेकून देण्या ऐवजी आपण त्यांना पुन्हा वापरू शकता.अशा प्रकारे आपण छत्री तुटल्यावर ती फेकून देऊ नका.  पुन्हा त्याचा वापर करू शकता. कसे काय तर जाणून घेऊ या 
 
* कपडे वाळत घाला -
छत्री जुनी झाली असेल आणि फाटली असेल तर आपण ते फेकून न देता त्याच्या वर छोटे छोटे कपडे वाळत घालू  शकता. या साठी छत्री उघडून त्यावर छोटे-छोटे कपडे घालून द्या. कपडे सहज वाळतील.
 
* प्लांट स्टेक्स बनवा- 
तेज हवेमुळे छत्री फाटली असेल तर हे फेकून न देता आपल्या बागेत  वापरा जड झाडांना हे आधार देतील. 
 
* कोट हुक बनवा- 
छत्रीचे हॅण्डल काढून त्याला आपल्या सोयीनुसार भिंतीवर किंवा कपाटात लावून घ्या आणि त्यावर कपडे हँग करू शकता. 
 
* घर सजवा-
तुटलेली छत्री घराच्या सजावटी मध्ये देखील कामी येते आपण छत्री बंद करून मधून रिबन बांधून द्या आणि बनावटी फुले लावून घराच्या सज्जेसाठी वापरा. अशा प्रकारे आपल्या घराला चांगले लूक येईल . 
 
* पिकनिक मध्ये कामी येईल- 
पिकनिक किंवा सहलीला जाताना जुन्या छत्रीचे हॅण्डल काढून आपण जाळी प्रमाणे ठेऊन खाण्याच्या पदार्थाला माशी किंवा इतर कीटक पासून वाचवू शकता.अशा प्रकारे सूर्य प्रकाशाने आणि धुळेपासून देखील खाद्य पदार्थ सुरक्षित राहील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती