लहान बाळासाठी खरेदी करतांना या गोष्टी लक्षात ठेवा

मंगळवार, 9 मार्च 2021 (09:55 IST)
एक जोडपे पालक बनतात तेव्हा तो त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद असतो.ते दोघेही आपल्या बाळाची एकत्रितपणे काळजी घेतात. त्यांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करतात. त्यांच्या साठी खरेदी करतात. बऱ्याच वेळा आपण आनंदात येऊन मुलांच्या कपड्यांवर आणि वस्तूंवर बरेच पैसे खर्च करून टाकतो आणि त्या साठी वेळ पण वाया जातो. असं होऊ नये या साठी आम्ही काही टिप्स सांगत आहोत ज्याच्या मदतीने आपण पैसे आणि वेळ दोन्ही वाचवून चांगली खरेदी करू शकता. चला तर मग जाणून घेऊ या.  
 
* दर तपासून घ्या-
आपण मुलांसाठी काही घेऊ इच्छित आहात तर सर्वप्रथम एक यादी तयार करा. मुलांच्या अति आवश्यक असलेल्या गोष्टींना प्राधान्यता द्या. ऑफ लाईन आणि ऑनलाईन दोन्ही दर तपासून बघा. जेणे करून आपल्याला लक्षात येईल की कुठे स्वस्त मिळत आहे आणि आपण खरेदी करू शकता. या मुळे आपले पैसे आणि वेळेची बचत होईल.
 
* साधे कपडे घ्या- 
मुलांसाठी नेहमीच साधे कपडे घेतले पाहिजे जेणे करून त्यांना त्या कपड्यांमुळे काही त्रास होऊ नये. बऱ्याचदा आपण आपली हौस पूर्ण करण्यासाठी चमकदार रिबन असलेले फ्रील्सचे कपडे विकत घेतो हे दिसायला खूप छान दिसतात. पण या मुळे मुलांच्या त्वचेवर पुरळ येतात. तसेच हे कपडे वारंवार बदलावे लागतात. म्हणून साधे कपडेच खरेदी करा. 
 
* वाढते कपडे खरेदी करा- 
मुलांचे कपडे खरेदी करताना एक चूक करतो की मुलांचे कपडे अगदी मापाचेच घेतो. जे काही काळातच आखूड आणि लहान होतात. आणि ते काहीच कामाचे नसतात. असं करू नका या साठी मुलांसाठी सैलसर आणि काहीसे मोठे कपडे खरेदी करा. जेणे करून आपल्याला लवकर कपडे खरेदी करावे लागणार नाही.
 
* आरामदायी कपडे खरेदी करा- 
जेव्हा आपण मुलांसाठी कपडे खरेदी करत आहात तेव्हा लक्षात ठेवा की मुलांसाठी कपडे खरेदी करताना ते आरामदायी असावे. बऱ्याच वेळा कपड्यांच्या इलॅस्टिक मुळे किंवा कपडे घासले गेल्यामुळे देखील मुलाच्या त्वचेला नुकसान होऊ शकते. म्हणून मुलांच्या कपड्याची निवड करताना कपडे आरामदायी असावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती