किशमिश आणि मनुका मध्ये काय फरक आहे, जाणून घ्या आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय?

रविवार, 13 ऑक्टोबर 2024 (06:36 IST)
Kishmish Munakka Difference: किशमिश आणि मनुका दिसायला अगदी एकसारखे आहे, पण यांचे पोषकतत्व वेगवेगळे आहे. जाणून घ्या किशमिश किंवा मनुका आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय?
 
किशमिश आणि मनुका दोन्हीही आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अनेक लोक यांना एकाच समजतात.  पण दोघींमध्ये खूप अंतर आहे. किशमिश आणि मनुका ड्राई फ्रूट्स (dry फ्रुटस) लिस्ट मध्ये सहभागी आहे. किशमिश खाल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. तर मनुका खाल्याने शरीरात रक्त वाढते.  
 
किशमिश मनुका मधील फरक- 
किशमिशचा आकार छोटा आणि बारीक असतो. मनुका मोठी आणि जाड असते. किशमिशचा रंग थोडा हल्का असतो. तर मनुका डार्क ब्राउन कलरची असते. किशमिशची चव थोडी आंबट असते आणि मनुका गोड असते. छोट्या द्राक्षांना वाळवून किशमिश तयारकेली जाते. यामध्ये बिया नसतात. मुनका मोठे आकाराचे द्राक्ष वाळवून तयार केली जाते मनुका मध्ये अनेक बिया असतात. 
 
किशमिशचे फायदे-
किशमिशमध्ये आयरन, प्रोटीन, फाइबर, कॅल्शियम, मॅग्नाशीयम, पोटॅशियम, कॉपर आणि मॅगनीज असते. किशमिशला विटामिन बी6 चा सोर्स मानले जाते. किशमिश खाल्याने बद्धकोष्ठता दूर होते.  फाइबरने भरपूर किशमिश पुरुषांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. लहान मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास जलद करते. भिजवलेले किशमिश खाल्याने वजन कमी होते. हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी किशमिश खाणे फायदेशीर मानले जाते. 
 
मनुकाचे फायदे- 
मनुका मध्ये भरपूर कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नाशीयम, बीटा कॅरोटीन, अँटीबॅक्टिरियल गुण असतात.  शरीरात रक्त वाढवण्यासाठी मनुका मदत करतात. फाइबरयुक्त भरपूर मनुका खाल्याने पाचन मजबूत होते. एनीमियाच्या रुगणांनी मनुका खाव्या. ब्लड प्रेशर कमी झाल्यास मनुका खाव्या. हार्ट हेल्थ आणि कोलेस्ट्रॉलला नियंत्रित करण्यासाठी मनुका मदत करतात. मनुका दुधात किंवा पाण्यात भिजवून खाल्ल्यास फायदे मिळतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती