मूत्राचे सूत्र: थांबवू नका, करा

मूत्र विसर्जन करणे आवश्यक कार्य आहे, या कामात कमी वेळ लागत असला तरी शरीराच्या आरोग्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे.
मूत्राशयाची क्षमता- सामान्यतः: एक व्यक्ती दिवसातून सात वेळा मूत्र विसर्जन करत असतं. मूत्राशय 500 ते 600 एमएल मूत्र साठवून ठेवू शकतं अर्थात तीन ते चार ग्लासाएवढे.
 
अनावश्यक तत्त्वांपासून सुटकारा- मूत्र शरीरातून केवळ पाणी बाहेर टाकत नसून याद्वारे अनावश्यक तत्त्वही शरीरातून बाहेर पडतात. आमची किडनी फिल्टर करून हे तत्त्व मूत्राशयामध्ये पाठवते जिथून मूत्र विसर्जन द्वारे हे बाहेर पडतं.
 
महिला आणि पुरुषात अंतर- जी नळी मूत्र मूत्राशयाने शरीराच्या बाहेर काढते त्याला यूरेथ्रा म्हणतात. महिलांमध्ये यूरेथ्राची लांबी 4.8 ते 5.1 सेंटिमीटर पर्यंत असते जेव्हाकि पुरुषांमध्ये ही सुमारे 20 सेंटिमीटर असते.
 
वयमानाने बदल- वय वाढले की अंग आणि स्नायू कमजोर पडू लागतात. म्हणून वृद्ध लोकांना मूत्र विसर्जन करायला अधिक वेळ लागतो.
 
वारंवार- कमजोर अंगांमुळे वृद्ध लोकांच्या मूत्राशयामध्ये मूत्र राहून जातं म्हणून त्यांना वारंवार विसर्जन करण्याची गरज भासते.


पुढे वाचा, मूत्र काय आहे? 

मूत्र काय आहे? 
मूत्रात सुमारे तीन हजार तत्त्व असतात. 2013 मध्ये केलेल्या एका शोधाप्रमाणे मूत्रात 95 टक्के पाणी आणि तीन टक्के युरिया असतं. याव्यतिरिक्त शरीरातून प्रोटीनच्या प्रोसेसिंगने निघत असलेले अवयव असतात.
 
जीवाणू मुक्त नाही- 2014 मध्ये केलेल्या संशोधनाप्रमाणे मूत्र जीवाणू मुक्त नसतं.
 
रंग- मूत्राचा पिवळा रंग शरीरात पाण्याची कमी दर्शवतं. अनेकदा आजारामुळे ‍हा रंग पिवळा असतात. जर मूत्राचा रंग लाल आहे तर किडनीचा आजार किंवा कर्करोग होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
 
वेदना होते?
मूत्र विसर्जन करताना वेदना होत असेल तर डॉक्टरकडे जाण्याची गरज आहे. या वेदनेचे कारण किडनी, मूत्राशय किंवा यूरेथ्रामध्ये इन्फेशन असू शकतं.
 
थांबवून ठेवणे- मूत्र विसर्जन थांबवून ठेवण्याने इन्फेशन होण्याची शक्यता असते. तसेच काही डॉक्टर ही गोष्ट नाकारता तरी मजबूरी नसल्यास मूत्र थांबवणे योग्य नाही.

वेबदुनिया वर वाचा