ओव्हर टाइम केल्याने हार्ट अॅटकची शक्यता वाढते

ऑफिस मध्ये नेहमी ओव्हर टाइम करणे आपल्या खिशासाठी चांगलं असलं तरी हे आपल्या आरोग्यासाठी नक्कीच धोकादायक ठरू शकतं. एक संशोधनाप्रमाणे आठवड्यात 55 तास किंवा यापेक्षा जास्त काम करणार्‍यांना 35 ते 40 तास काम करणार्‍यांच्या तुलनेत हार्ट अॅटकची शक्यता जास्त असते.
 
युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनचे प्रोफेसर मिका किविमाकी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी जास्त वेळ काम करणार्‍यांवर आणि त्यांच्या आरोग्यावर शोध केला. 6 लाख लोकांवर करण्यात आलेल्या या शोधातून हे निष्कर्ष काढण्यात आले आहे. यात युरोप, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या कर्मचार्‍यांना सामील करण्यात आले होते.
 
शोधाप्रमाणे एका आठवड्यात 35 ते 40 तास काम करणार्‍यांच्या तुलनेत 55 तास किंवा याहून अधिक तास काम करणार्‍यांना हार्ट अॅटकची शक्यता 13 टक्क्यांनी वाढते.

वेबदुनिया वर वाचा