असे ओळखा प्लॅस्टिक तांदूळ

आजकाल भेसळयुक्त खाद्य पदार्थांची सर्रास विक्री होत आहे. भाज्या, दूध, फळ, आणि इतर खाद्य पदार्थ भेसळयुक्त असल्याचे ऐकले आहेत पण आता तांदूळ प्लॅस्टिकने तयार केले जात आहे हे ऐकून मात्र धक्काच बसला. हो खरं आहे हे.... हे प्लॅस्टिक तांदूळ चीनमध्ये तयार केले जात आहे. हे सामान्य तांदुळाबरोबर मिसळून विकले जातात. कच्चे असताना किंवा शिजल्यावरही आपण यात अंतर करू शकत नाही. कारण हे अगदी खरोखरच्या तांदळासारखे दिसतात. 
हे तांदूळ पूर्णपणे प्लॅस्टिकचे नसून बटाटे, रताळे आणि प्लॅस्टिक मिसळून तयार केले जातात. म्हणून यांना ओळखणे सोपे नाही. याचा रंग, स्वाद, आकार पाहून याची चाचणी करणे सोपे नाही. चीनहून आयात होणारे हे तांदूळ हळू-हळू बाजारात आपली जागा जमवत आहे. निश्चितच आरोग्यासाठी हे फार नुकसानदायक ठरणार आहे. 
 
पुढे वाचा यामुळे होणारे नुकसान
 

यामुळे होणारे नुकसान:
 
हे तांदूळ पोटात गेल्यावर पचतही नाही आणि सडतही नाही.
हे खाल्ल्याने पोटातील रोग होऊ शकतात.
याचे नियमित सेवन केल्याने कर्करोग होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही.

- कसे ओळखाल हे तांदूळ

हे सामान्य तांदळापेक्षा अधिक चमकदार, वजनात हलके, स्वच्छ आणि अख्खे अर्थात ‍विना तुटलेले असतात.
 
तांदूळ धुताना हा पाण्यात वरील बाजूला येत नाही कारण हे पूर्णपणे प्लॅस्टिकचे नसतात. जेव्हा की काही तांदूळ धुताना पाण्यात वर येतात.
 
हे शिजायला सामान्य तांदळापेक्षा अधिक वेळ घेतात.
शिजल्यानंतरही याचे शीत करडे असतात.
 
शिजताना तांदुळातून निघालेलं पाणी प्लॅस्टिक सारखं दिसतं आणि याला वाळवून जाळल्यावर हे प्लॅस्टिकप्रमाणे जळायला लागतं.

वेबदुनिया वर वाचा