या महिन्यात दोन ग्रहण, प्रभावशाली राहील 21 जून रोजी लागणारं सूर्य ग्रहण, हे उपाय करावे लागणार

सोमवार, 1 जून 2020 (15:01 IST)
या जून महिन्यात दोन ग्रहण लागणार आहे. 5 जून रोजी लागणारं चंद्र ग्रहण पृथ्वीवर विशेष प्रभाव सोडणार नाही. हे केवळ उपछाया चंद्र ग्रहण असणार. परंतू 21 जून रोजी लागणारं पहिलं सूर्य ग्रहण पृथ्वीवर खास प्रभाव सोडणार, याचा प्रभाव संपूर्ण देशावर बघायला मिळणार. 
 
ज्योतिष्यांप्रमाणे या सूर्यग्रहणात कंकण आकृती तयार होत आहे। या दिवशी रविवार असल्यामुळे चूडामणी योग देखील बनत आहे ज्यामुळे हे ग्रहण हानिकारक ठरेल. वृश्चिक राशीच्या जातकांना अधिक सावध राहण्याची गरज आहे. 
 
या वर्षीच पहीलं सूर्य ग्रहण सकाळी 10.23 ते दुपारी 1.47 वाजेपर्यंत राहील. ग्रहण पर्व काल 3 तास 24 मिनिटं असेल. ग्रहण सूतक एक दिवसापूर्वी म्हणजे 20 जून रोजी रात्री 10.24 वाजेपासून लागेल. 
 
सूर्य ग्रहणच्या दिवशी सूर्याकडे बघणे योग्य नाही. 
ग्रहणानंतर गंगा स्नान, दान, जप, पूजा, हवन करावे.
खाद्य पदार्थांवर तुळशीचे पान ठेवल्याने त्यावर ग्रहणाचा प्रभाव होत नाही. 
 
तसेच या वर्षी पाच जून रोजी दुसरं चंद्र ग्रहण लागणार आहे. उपछाया चंद्र ग्रहणात चंद्र, पृथ्वीच्या सावलीतून निघणार. याने राशींवर अधिक प्रभाव पडणार नसून याचे सूतक देखील मान्य नसेल. ज्योतिष्याप्रमाणे चंद्र ग्रहणाच्या प्रभावाला घाबरण्याची गरज नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती