Chandra Grahan 2020: 10 जानेवरीला वर्षातील पहिलं ग्रहण चंद्र ग्रहण

बुधवार, 8 जानेवारी 2020 (11:44 IST)
हिंदू धर्मात ग्रहणाचे फार महत्व आहे. धर्मानुसार ग्रहणाचा चांगला किंवा वाईट परिणाम प्रत्येक व्यक्तीवर पडतो. यंदाच्या वर्षी एकूण 6 ग्रहण लागणार आहे. ह्यात 2 सूर्य ग्रहण आणि 4 चंद्र ग्रहण असणार. यंदा सर्व चंद्र ग्रहण ग्रहणाच्या सावलीत असणार. अर्थात ह्यात चंद्र पूर्ण लपत नाही. त्याची सावली पृथ्वीवर पडत नाही.    
 
वर्षाचे पहिले चंद्रग्रहण कधी होणार :-
ह्या वर्षातील पहिले ग्रहण 10 जानेवारी रोजी होणार आहे. हे ग्रहण रात्री 10:37 पासून सुरु होऊन 11 जानेवारीच्या सकाळी 2:42  मिनिटे पर्यंत असणार. या ग्रहणाची अवधी 4 घंटे 5 मिनिट असी असणार आहे.
 
चंद्रग्रहण सर्वत्र दिसणार :-
हे ग्रहण भारताव्यतिरिक्त युरोप, एशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया खंडात ही बघितले जाणार. या वर्षाचे बाकीचे चंद्रग्रहण 5 जून, 5 जुलै आणि 30 नोव्हेंबरला पडणार. ज्योतिष शास्त्रज्ञांच्या मते, ज्या राशीला हे ग्रहण लागते त्या राशीवर त्याचा जास्त प्रभाव पडतो. यंदाचे हे ग्रहण मिथुन राशीवरचे असणार.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती