वस्त्र
ज्योतिषशास्त्रानुसार ज्यात घरातील गृहलक्ष्मी प्रसन्न असते तेथे नेहमी देवी लक्ष्मीचा वास असतो आणि पत्नी दु:खी असल्यास धन संबंधी समस्यांना सामोरा जावं लागतं. म्हणून बुधवार किंवा शुक्रवारच्या दिवशी गृहलक्ष्मीला वस्त्र भेट करावे. गृहलक्ष्मीसह आपण बहीण, आई किंवा इतर स्त्रियांना देखील वस्त्र भेट करू शकतात याने शुभ फल हाती येतील.
दागिने
शास्त्रांप्रमाणे दागिन्यांशिवाय देवीची पूजा अपुरी मानली जाते. म्हणून देवीच्या पूजेत दागिने अवश्य अर्पित केले जातात. गृहलक्ष्मीला देखील दागिने आवडतात म्हणून अधून-मधून लहानच का नसो परंतू दागिने भेट द्यावे. तसंही दागिन्यांनी सजलेली गृहलक्ष्मी घराची संपन्नता दर्शवते म्हणून शास्त्रांप्रमाणे गृहलक्ष्मी सुंदर वस्त्र आणि दागिन्यांनी सजलेली असावी.
शृंगार
सवाष्णीच्या वस्तू जसे सिंदूर, बिंदी, बांगड्या, पैंजण, या वस्तू देण्याने सौभाग्य वाढतं. याने देवी प्रसन्न होते म्हणून या वस्तू भेट देणेही योग्य ठरेल.