तुम्ही टेन्शन आणि अडचणीत असल्यास हे उपाय करून बघा

मंगळवार, 3 ऑगस्ट 2021 (23:48 IST)
आजकाल मानवी जीवन खूपच धावपळीचे झाले आहे. कामाच्या ओझ्यामुळे अनेकजण मानसिक शांती हरवून बसल्याचे पाहायला मिळते. कुणाकडेही आपल्या स्वत:साठी वेळ नाहीय. मानसिक टेन्शनपासून मुक्ती हवी असेल तर खाली सांगितलेले उपाय करा.
 
लहान सहान उपाय
 
घरात जाळे जळमटे तयार होऊ देऊ नका.
 
स्वयंपाकघरातील ओटा काळा नको.
 
स्वयंपाकघरातच बसून जेवण करा.
 
रात्री भांडी घासू नका.
 
संध्याकाळी भोजन आणि स्रान करू नका.
 
संध्याकाळी घरात धूप, उदबत्तीचा सुगंध दरवळू द्या.
 
दिवसातून एकदा चांदीच्या पेल्यातून पाणी प्या. याने क्रोध नियंत्रणात राहील.
 
झोपण्याच्या खोलीत मद्यपान नका करू.
 
काटेरी झुडपं घरात लावू नका.
 
स्वयंपाकघरात अग्नि आणि पाणी एकत्र ठेवू नका.
 
हे उपाय छोटे छोटे वाटत असले तरी यामुळे तुम्हास मन:शांती मिळेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती