इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ

शुक्रवार, 23 जुलै 2021 (19:45 IST)
प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच इंदोरीकर महाराजांच्या लिंग भेदभावाला प्रोत्साहन देणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्या वर खटला दाखल करण्यात आला होता.त्या खटल्या संदर्भात संगमनेर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयानं दिलासा दिला होता.परंतु महाराष्ट्र अनिस पाठोपाठ आता सरकारी पक्षाच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात संगमनेर न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.त्यामुळे इंदोरीकर महाराजांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
 
इंदोरीकर महाराजांच्या पुत्रप्राप्ती संदर्भात दिलेल्या विधानामुळे मोठा गदारोळ निर्माण झाला होता.''स्त्री संग संम तिथीला समागम केल्याने मुलगा होतो,विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग ताशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी,बेवडी,खानदानाला मातीत घालणारी होते".अशा वादग्रस्त विधान इंदोरीकर महाराज यांनी केले होते.या विधानावर जिल्ह्या आरोग्य विभागाने महाराजांना पीसीपीएनडीटी कायद्यानुसार नोटीस पाठवून या विधानाचे स्पष्टीकरण मागितले होते.या वर महाराजांनी हे वक्तव्य कधी केले याचा काही पुरावा नाही.असं वकिलामार्फत उत्तर देऊन खुलासा केला.मात्र काही अंधश्रद्धा निर्मूलन समिती द्वारे या प्रकरणाचे पुरावे आरोग्यविभागाला देऊन आरोग्य विभागाने इंदोरीकर महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती