सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात अध्ययनासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी.साठी जागतिक स्तरावर तीनशेच्या आतील रँकमधील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांने नमुन्यातील अर्ज www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील रोजगार या लिंकवरुन डाऊनलोड करून घ्यावा. हा अर्ज
[email protected] या इ मेलवर पाठवून त्याची प्रत मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह समाज कल्याण आयुक्तालय, चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे- ४११००१ या पत्त्यावर द्यावी.