नवग्रहांची शांती पाहिजे, तर करावी गणेशाची पूजा

बुधवार, 23 डिसेंबर 2020 (08:45 IST)
श्री गणेशाची पूजा नवग्रहांना शांत करण्यासाठी आणि माणसाला सांसारिक आणि आध्यात्मिक फायदा पुरविण्यासाठी आहे. अथर्वशीर्षात ह्यांना सूर्य आणि चंद्रमा म्हणून संबोधले आहेत.
 
ज्योतिषशास्त्रात गणेशाला बुध ग्रहाशी संबंधित केले आहे. ह्यांची पूजा नवग्रहांच्या शांती, आणि माणसाच्या सांसारिक आणि आध्यात्मिक फायदे पुरविण्यासाठी आहे ह्यांना अथर्वशीर्षात सूर्य आणि चंद्रमा म्हणून संबोधले आहे. 
 
सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी प्रथम वंदन देव आहे. ह्यांची किरणे चंद्रमाच्या सम थंड आहे. गणेशाच्या शांतीपूर्ण प्रकृतीचे गुणधर्म चंद्रमा मध्ये आहे. वक्रतुण्डात देखील चंद्रमा आहे. 
 
पृथ्वी पुत्र मंगळा मध्ये उत्साही स्वभावाची निर्मिती एक दंतामुळेच आली आहे. बुद्धी आणि विवेकाचे देव असल्यामुळे बुध ग्रहाचे अधिपती देव असल्यामुळे लोकांचे मंगळ करण्यासाठी, साधकांची कामे सहजरित्या निर्वंघ्नपणे पूर्ण करण्यासाठी विघ्नहर्ता असल्यामुळे यांच्याशी बृहस्पती देखील समाधानी आहे.
 
धन, पुत्र, ऐश्वर्याचे स्वामी श्री गणेश आहे, तर या भागाचे ग्रह शुक्र मानले आहे. शुक्रदेव शक्तीचे संचालक आदिदेव आहे. धातू आणि न्यायाचे देव नेहमी आपल्या साधकांची त्रास आणि संकटापासून रक्षण करतात. म्हणून शनी ग्रहांशी यांचा थेट संबंध आहे. 
 
गणेशाचा जन्म दोन शरीर(नर आणि हत्ती) पासून झाला आहे. अशा प्रकारे राहू आणि केतू च्या स्थितीत देखील अशी उलट स्थिती आहे, म्हणजे गणपती प्रमाणे राहू केतूच्या एका शरीराचे दोन भाग आहे म्हणून हे देखील  गणपतीशी समाधानी आहे.
 
अडथळे, आळस, आजारपण, अपत्ये, अर्थ, बुद्धी, विवेक, यश, प्रसिद्धी आणि सिद्धी मिळविण्यासाठी जरी आपल्या भाग्यात ग्रहांची स्थिती बनलेली नसेल ती गणेशाच्या पूजेने सहज मिळू शकते. 
 
गणेशाची पूजा, जप, ग्रहांचे पठण स्तुती केल्याने ग्रहांची शांती होते. कोणत्याही ग्रहाचा त्रास असल्यावर काहीही उपाय सुचत नसल्यावर गणपतीच्या शरणी जाऊन समस्येचे निराकरण करता येते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती