हळदीची माळ घालण्याचे किंवा जप करण्याचे फायदे

मंगळवार, 8 डिसेंबर 2020 (08:33 IST)
माळ तर अनेक प्रकाराची असते, जसे की फुलांची, रत्नांची, बियाणांची, धातूंची, चंदनाची माळ, रुद्राक्षाची माळ, तुळशीची माळ, स्फटिकाची माळ, कमळ गट्ट्याची माळ, मोती किंवा मुंग्याची माळ इत्यादी. पण काही माळ अशी असतात ज्या क्वचितच घातल्या जातात किंवा काही विशेष कारणास्तव घालतात किंवा फायद्यासाठी घातल्या जातात. या पैकी एक आहे हळदीची माळ. चला जाणून घेऊ या की हळदीची माळ का घालतात.
 
1 हळदीची माळ भगवान विष्णूंना प्रिय आहे. या माळीने जप केल्याने ते प्रसन्न होतात.
 
2 बृहस्पती ग्रहाचे शुभत्व वाढविण्यासाठी हळद किंवा जिया पोताझची माळ वापरतात. बृहस्पतीच्या मंत्राचा जप केल्यानं आयुष्यात सुख आणि शांतता नांदते.
 
3 या माळी ने बगलामुखी मंत्राचा जप केल्यानं सर्व प्रकाराच्या शत्रूंचे अडथळे नाहीसे होतील.
 
4 गणपतीच्या मंत्राचे जप या माळीने केल्यानं सर्व प्रकाराचे त्रास नाहीसे होतील आणि नोकरीत आणि व्यवसायात फायदा होईल.
 
5 हळदीची माळ विशेषतः धनू आणि मीन राशीच्या लोकांसाठी उपयुक्त मानली जाते. 
 
6 हळदीची माळ नशिबाच्या दोषाचे हरण करते.
 
7 हळदीची माळ धन आणि इच्छापूर्ती आणि आरोग्यासाठी चांगली असते.
 
8 असे मानले जाते की कावीळ झालेल्या व्यक्तीला हळदीची माळ घातल्यानं त्याची कावीळ बरी होते.
 
9 मानसिक त्रासातून मुक्त होण्यासाठी गुरुवारी हळदीची माळ घालावी. 
 
10 यशाच्या प्राप्तीमध्ये काहीही अडथळे येत असल्यास हळदीची माळ घालावी.
 
11 लग्नात काही अडथळे येत असल्यास गुरुवारी हळदीची माळ घालावी.
 
12 जन्मकुंडलीत गुरु नीचचा असल्यास हळदीची माळ घालावी.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती