स्वप्नात दिसणाऱ्या या गोष्टी धनलाभ देतात

शनिवार, 19 डिसेंबर 2020 (10:23 IST)
असे म्हणतात की स्वप्न खूपच प्रभावी असतात आणि त्यांचे फळ प्रत्येकाला मिळतात. स्वप्नशास्त्र हे स्वप्नांवर आधारित असलेले शास्त्र आहे. या शास्त्राचा शोध लावणाऱ्यांनी या स्वप्नांचा अभ्यास करून हे जाणून घेण्याचे प्रयत्न केले की जेव्हा एखाद्याला स्वप्न पडतात तर त्याला त्या स्वप्नाचे काय फळ मिळतात. असे म्हणतात की स्वप्नशास्त्रात सांगितलेले काही युक्तिवाद खरे असतात. स्वप्न शास्त्रात इतर स्वप्नांसारखेच काही स्वप्नांबद्दल सांगितले आहे. ज्यांच्या मुळे धनलाभ होण्याचे योग बनतात. चला तर मग जाणून घेऊ या अशा काही स्वप्नांबद्दल.
 
1 स्वप्नात प्रसाद खाणं - 
ईश्वराच्या प्रसादाला खूपच शुभ मानले आहे. असे म्हणतात की स्वप्नात प्रसाद बघण्याचा अर्थ धनाशी जुडलेले असते. असे म्हणतात की जर एखाद्याने असे स्वप्न बघितले तर त्यामुळे त्यांना अफाट धनाची प्राप्ती होण्याचे योग संभवतात. म्हणून या स्वप्नांना परिवर्तनशील मानले आहे. असे म्हणतात की हे स्वप्न बघितल्यावर भगवान श्री विष्णू यांना पिवळ्या रंगाचा नैवेद्य द्यावा.

2 कचऱ्याचा ढिगारा - 
खरं तर कचऱ्याला चांगले मानत नाही. पण जर आपल्याला स्वप्नात कचरा दिसला तर हे धनलाभासाठी अत्यंत शुभ असत. असे म्हणतात की हे स्वप्न इतकं प्रभावी असत की हे व्यक्तीची आर्थिक स्थितीला पूर्णपणे बदलून टाकतं. लक्षात ठेवा की या स्वप्नाला बघितल्यावर कोणालाही या स्वप्नाबद्दल सांगू नका आणि शक्य असल्यास असे स्वप्न बघितल्यावर आई महालक्ष्मीला लाल फुल अर्पण करा.
 
3 मोर नृत्य - स्वप्नांत जर आपण स्वतःला निसर्गाच्या मध्ये बघत असाल आणि आपल्या सामोरी एक मोर नाचताना दिसत असल्यास हे स्वप्न खूपच शुभ असतं. असे म्हणतात की हे स्वप्न बघितल्यावर धनलाभाचे योग बनतात. असे म्हणतात की असं स्वप्न कोणालाही सांगू नका. कारण कोणाला जर या स्वप्नाबद्दल संगितले तर त्याचा प्रभाव कमी होऊ शकतो. म्हणून प्रयत्न करा की हे स्वप्न बघितल्यावर ॐ श्री श्रीआये नमः मंत्राची 11 जपमाळ करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती