माणसाचा खरा मित्र कुत्रा

सोमवार, 2 नोव्हेंबर 2020 (09:35 IST)
* अगदी सुरुवाती पासूनच, कुत्रा हे अतिशय प्रामाणिक प्राणी मानले जाते. हे मानवाच्या खूप कामी येतात. हे माणसाची शारीरिक आणि मानसिकरीत्या संरक्षण करतात.  
 
* जगभरात सुमारे 400 दशलक्षांहून अधिक कुत्री आहेत. 
 
* कुत्री खूप उपयुक्त असतात, ते शेतीचे सर्व कामे पूर्ण करतात. संरक्षण देतात, शिकार करू शकतात, इतकेच नव्हे तर ते अपंगांना मार्गदर्शन देखील करतात. कुत्र्यांमध्ये काळजी आणि प्रेमाची समज असते म्हणून ते मुलांचे आणि म्हाताऱ्यांचे सर्वात छान मित्र असतात.
 
* कुत्र्यांच्या जातीमध्ये लॅब्राडोर, गोल्डन रिट्रिव्हर, बुलडॉग, जर्मन शेफर्ड, ग्रेहाऊंड, सेंट बर्नाड, ग्रेट डेन, चीहूआहुआ इत्यादी डॉग्सच्या प्रजाती प्रख्यात आहेत.
 
* माणसांच्या तुलनेत कुत्री बरेच चांगल्या प्रकारे ऐकू शकतात आणि ते चार पटीने दूरची आवाज ऐकू शकतात. 
 
* कुत्र्यांचे आयुष्य किंवा वय त्याचा प्रजातीनुसार बदलते जे 10 ते 14 वर्षाच्या मध्ये असत.
 
* कुत्र्यांची वास घेण्याची क्षमता जास्त असते ज्यामुळे ते विविध प्रकाराची गंध समजू शकतात. या कारणास्तव ते संपूर्ण जगभरात अँटी टेरेरिस्ट स्क्वाड ( दहशतवाद विरोधी पथक) आणि पोलीस कुत्र्यांचा वापर ड्रग्स आणि शस्त्रे वास घेऊन शोधण्यासाठी करतात.
 
* वैज्ञानिकांनी दिलेल्या प्रमाणानुसार, कुत्र्यांना गेल्या 15000 वर्षांपासून पाळतात आणि त्यांना प्रशिक्षण दिले जाते.
 
* पाळीव कुत्रे सर्वभक्षी असतात कारण ते धान्य, भाज्या, मीट देखील खातात.
 
* कुत्री खूप भावनिक असतात आणि जर ते आपल्याला मालकाला एखाद्या दुसऱ्या माणसाशी किंवा प्राण्याशी मैत्रिपूर्ण व्यवहार करताना बघितल्यावर त्यांना त्याचा त्रास होतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती