अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू

शनिवार, 1 ऑगस्ट 2020 (09:10 IST)
अमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नॅशनल जिओग्राफिक मासिकाने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे. 
 
‘बडी’ असे या कुत्र्याचे नाव असून, अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेला हा पहिलाच कुत्रा आहे. एप्रिल महिन्यात हा कुत्रा आजारी पडला होता. त्याचवेळी त्याचा मालक रॉबर्ट महोनी कोरोनामुक्त झाला होता. एप्रिलच्या  मध्यात त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर काही आठवड्यानंतर या कुत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. 
 
उपचारानंतर या कुत्र्याची प्रकृती स्थिर झाली. मात्र ११ जुलैला कुत्र्याची प्रकृती खालावली. त्याने रक्ताच्या उलट्या करण्यास सुरुवात केली. तसेच त्याच्या मूत्राशयातूनही रक्त येत होते. त्याचवेळी त्याचा मृत्यू झाला. प्राण्यांमध्ये कोरोना व्हायरसचा पुरेसा डेटा नव्हता. तसेच पशुवैद्यकीय दवाखाने बंद होते. कोविडच्या वैज्ञानिक आधारावर आम्हाला यातला अनुभव शून्य होता. त्यामुळे बंडीचे निदान करणे कठीण गेले, असे बडीची चाचणी घेणाऱ्या रॉबर्ट कोहेन यांनी नॅशनल जिओग्राफिक या मासिकाला सांगितले.
 
अमेरिकेत सध्या १२ कुत्री, १० मांजरी, १ वाघ आणि एका सिंहाला कोरोनाची लागण झाली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती