Dr. Vilas Ujwane passes away : मराठी प्रसिद्ध अभिनेने डॉ. विलास उजवणे यांचे निधन झाले आहे. त्यांनी 'चार दिवस सासूचे', 'वादळवाट', 'दामिनी, या प्रसिद्ध मराठी मालिकांमधून वेगळीच छाप उमटवली आहे. या लोकप्रिय भूमिकेमध्ये त्यांनी भूमिका केली होती. तसेच विलास उजवणे यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. नाटकांमध्ये देखील भूमिका साकारल्या आहे.
डॉ. विलास उजवणे यांनी वयाच्या ६२ वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठीसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. डॉ. विलास उजवणे हे मागील काही दिवसानापासून गंभीर आजारांची लढा देत होते. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोक देखील झाला होता. ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला होता. तसेच ते हृदय संबंधित आजारांनी ग्रस्त होते. तसेच सांगण्यात येते आहे की, काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मीरा रोड स्थित एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.