तसेच सईची ही लावणी चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी एप्रिलमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, चाहत्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी ही एक विशेष भेट असणार आहे. सई पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर लावणी सादर करताना दिसणार आहे. यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली पाहावयास मिळत आहे.
आगामी चित्रपट देवमाणूस या चित्रपटात अभिनेत्री सई ताम्हणकर लावणी सादर करतांना दिसणार आहे. तेजस देऊस्कर दिग्दर्शित 'देवमाणूस' या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर, प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे आणि अभिनेते सुबोध भावे हे दिसणार आहे असून हा चित्रपट येत्या 25 एप्रिलला प्रदर्शित होणार असल्याची माहीत समोर आली आहे. अभिनेत्री सई ताम्हणकरच्या लावणीची चर्चा चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच सुरू झाली आहे.