Vat Pornima 2023: वटपौर्णिमा पूजेसाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी
शनिवार, 3 जून 2023 (08:00 IST)
ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाचे ओळखली जाते. सुवासिनी महिला या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात. तर चला जाणून घ्या पूजेसाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी.
वटपौर्णिमा पूजेसाठी लागणारे साहित्य
सावित्री आणि सत्यवानाची मूर्ती
धूप- दीप-उदबत्ती
तूप
पाच प्रकारची फळं (सफरचंद, केळी, संत्री, मोसंबी, चिकू)
फुले
दिवा
वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा
पाणी भरलेला लहान कलश
हळद - कुंकू
पंचामृत (तूप, दही, दूध, मध आणि साखर यांचे मिश्रण एका वाटीत घालून एकत्र करणे)
हिरव्या बांगड्या
शेंदूर
एक गळसरी (काळी पोत)
अत्तर
कापूर
पूजेचे वस्त्र
विड्याचे पाने
सुपारी
पैसे
गूळ खोबऱ्याचा नैवेद्य
आंबे
दूर्वा
गहू
पूजा विधी पूजा विधी
पर्यावरणाच्या दृष्टीने वडाला खूपच महत्त्व आहे. वडाचे झाडे हे आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी लाभदायी ठरते. वडाच्या झाडेचे अनेक फायदे आहेत. या दिवशी प्रत्यक्ष वडाची पूजा करतात.
ज्येष्ठ पौर्णिमेला सुवासिनी महिला हे व्रत करतात. हे तीन दिवसाचे व्रत आहे. व्रतारंभ हा पौर्णिमेच्या आधी दोन दिवस करण्यात येतो. तरी शक्य नसल्यास केवळ पोर्णिमेला व्रत करुन पूजा करावी. दिवसभर उपवास करून यादिवशी रात्री हा उपवास सोडावा. हे तिन्ही दिवस अगदी षोडशोपचार पद्धतीने वडाची पूजा करावी. पण रोज शक्य नसल्यास, घरी पूजा, जप, नामस्मरण करण्यात यावे. तिसऱ्या दिवशी अर्थात वटपौर्णिमेला नित्यकर्म, आंघोळ आणि देवाची प्रार्थना, तुळशी पूजन करून वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा करावी.
व्रत करणार्यांनी दिवसभर उपवास करून फळांचे सेवन करावे. काही जण हा उपवास त्यात दिवशी रात्री मुहूर्ताप्रमाणे सोडतात. पण बऱ्याच महिला या दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा नित्यकर्म आटोपून आंघोळ करून देवाची पूजा करतात. देवाला दही आणि भाताचा नेवैद्य दाखवूनही हा उपवास सोडला जातो.