जय जय गणराया सांभाळी, अज्ञानी दासाया
जय जय गणराया ।।धृ।।
नित अव्ययरुपा, अवतरला शेगांवी ताराया।
गण ब्रह्मस्वरुपा, दुरितांचे, दाहन दंडून दृष्टा ।।
निर्जल, निजनाम शुभवरदा, सौख्य सदा नांदाया ।।1।।
जय जय जय गणराया
अन्नमू बह्रेती वेदश्रुती, गर्जती अवघ्या उक्ती ।
दावित साक्ष तिचि, प्रथम जगी प्रगटे चिन्मयमूर्ती ।
बंकट सदनाला, अविकारी दासा या सांभाळी ।।2।।
स्वामी समर्था तू नवमीला, दिधले दर्शन भक्ता ।
फुटला आम्रतरु, मृदुपर्णे, सकला तुज आळविता ।।
तव दर्शन घ्याया, नररुपे, प्रगटे मंगल रेवा भीमा
तटवासी। जगदात्मा, भक्त जनांचा ठेवा। गवसे तव ठायी।
गुरुराया गरुमहिमा वर्णाया। दुर्बल मम वाचा।
वर्षावी नित्य कृपा दासाया ।।3।।
जय जय गणराया, सांभाळी अज्ञानी दासाया
जय जय गणराया