Fengshuie Tips सहल आणि 'ची' ऊर्जा!

शुक्रवार, 31 मार्च 2023 (22:59 IST)
आपण कुठे ही बाहेर फिरायला जातो तेव्हा एखाद्या माध्यमाचा प्रयोग करतो जसे ट्रेन, बस किंवा प्लेन. पण जर तुम्ही स्वत:च्या गाडीने फिरायला जात असाल तर सर्वप्रथम आत व बाहेर दोन्ही बाजूने गाडीची स्वच्छता करावी. त्याने 'ची'चा प्रवाह चांगला होतो. तुम्ही हॉटेलमध्ये ज्या खोलीत थांबले असाल तिथे आधीपासूनच 'ची' ऊर्जा विद्यमान असेल कारण तुमच्या आधीपण तिथे लोकं थांबलेच असतील. या खोलीत तुमची ऊर्जा संचार करण्याअगोदर आधीची ऊर्जा बाहेर काढणे गरजेचे आहे म्हणून सर्वात आधी खोलीत गेल्याबरोबरच खिडक्या, वेंटिलेशन खोलावे. साउंड वाइब्रेशनद्वारे या जागेला उत्तम बनविण्यासाठी ताळी किंवा घंटी वाजवू शकता.
 
एरोमॅटिक ऑइल आणि स्वच्छ पाण्याने शिंपडून तुम्ही सकारात्मक 'ची'ला वाढवू शकता. खोलीतील बेडची दिशा देखील महत्त्वाची असते प्रयत्न करावा की ज्या बाजूला डोकं ठेवायचे असेल तिकडे भिंत असावी आणि चेहरा बाथरुमकडे नसावा कारण त्या बाजूने नकारात्मक ऊर्जा आत येते, म्हणून बाथरुमचे दार सतत बंद ठेवावे.
 
हॉटेलमध्ये पलंगाजवळ आरसा, लँप, फोन किंवा टीव्ही असल्यास ते थोडे दूर ठेवावे. आपल्या खिशात जेड स्टोनचा एक तुकडा ठेवावा. हा स्टोन हॉटेलच्या बाहेर जाताना तुमची रक्षा करेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती