साहित्य - 1 वाटी रवा, 1/2 वाटी मैदा, मीठ (चवीपुरती), तेलाचे मोहन, 2 वाटी पीठी साखर, 2 चमचे खसखस. सारणासाठी साहित्य - 1/2 वाटी किसलेले खोबरे, मावा, 2 चमचे रवा, दूध, वेलची पूड, चारोळ्या, बेदाणे, तळण्यासाठी साजूक तूप.
सारणाची कृती - मावा तांबूस रंग येईपर्यंत खरपूस भाजावा. त्या माव्याला थंड होण्यासाठी ठेवावे. किसलेले खोबरे पण परतून घ्यावे. रवा एका वाटीत थोडंसं दूध घालून नरम होण्यासाठी ठेवावा. खसखस भाजून त्याची भुकटी बनवावी. चारोळ्यादेखील परतून घ्यावा. थंड झालेल्या माव्यात किसलेले खोबरे, खसखस, वेलची पूड, भिजवलेला नरम रवा, पीठीसाखर, बेदाणे घालून सारण तयार करावं.