मराठवाडा एक्स्प्रेसमध्ये महिलेची प्रसूती

सोमवार, 20 मार्च 2023 (18:42 IST)
मराठवाडा एक्स्प्रेसमध्ये महिलेची प्रसूती छत्रपती संभाजीनगर :रविवारी  मराठवाडा एक्स्प्रेसमध्ये रेल्वेत असलेल्या महिला डॉक्टरांच्या तत्परतेमुळे एका महिलेची प्रसूती झाली.  
 
मराठवाडा एक्सप्रेसने जालना रेल्वेस्थानक सोडल्यानंतर एका गरोदर महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या. तेव्हा रेल्वेत कोणी डॉक्टर आहे का, याची शोधाशोध करण्यात आली. तेव्हा नांदेड येथील डॉ. अश्विनी इंगळे या रेल्वेत होत्या. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी मदतीसाठी धाव घेतली.
 
डॉ. इंगळे आणि इतर महिला प्रवाशांच्या मदतीने त्यांनी सदर महिलेची प्रसूती केली. सध्या बाळ आणि आई सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकावर रेल्वेची यंत्रणा मदतीसाठी सज्ज झाली होती. परंतु त्यापूर्वीच रेल्वेत डॉक्टर आणि महिला प्रवाशांच्या मदतीने प्रसूती झाली. मात्र मुकूंदवाडी येथून महिलेला पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले. रेल्वेतील टीसी राकेशकुमार मीना, अभिषेककुमार यांनी महिलेला मदत मिळवून देण्यात पुढाकार घेतला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती