स्टाईलिश दिसण्यासाठी हे फॅशन टिप्स अवलंबवा

गुरूवार, 10 जून 2021 (09:40 IST)
जीवनशैली कितीही व्यस्त असो, काळानुसार स्टाईलिश दिसणे ही आजकाल एक गरज बनली आहे, तर स्टायलिश दिसणे आपला आत्मविश्वासही मजबूत करते,ते वेगळेच.
आम्ही आपल्याला अशा काही ड्रेस बद्दल सांगत आहोत ज्यांना परिधान करून आपण स्टाईलिश दिसाल.
 
1 प्लाझो पॅन्ट- हे आकर्षक असण्यासह आरामदायी देखील असतात. याला आपल्या कपाटात जागा नक्कीच द्या.यासह आपण कॅज्युअल टॉप किंवा पारंपारिक कुर्ती घाला हे या दोघांनाही अनुकूल आहे. त्यांना प्रसंगानुसार परिधान करा आणि आकर्षक दिसा.
 
2 मॅक्सी ड्रेस- हे अतिशय आरामदायी असते,कोणत्याही हंगामात हे परिधान केले जाऊ शकते.हे सर्वांवर छान दिसतात. यांच्या सह फुटवेयर मध्ये हिल्स,फ्लॅट्स पासून व्हाईट स्नीकर्स देखील छान दिसतात.
 
3 शॉर्ट्स -आपण कधी शॉर्ट्स परिधान केले नसतील तर आपले फॅशन अपूर्ण आहे असे समजा.शॉर्ट्स क्रॉप टॉप,टॅंक टॉप शर्ट सह हे अतिशय स्टाईलिश लूक देतात.
 
4 जंपसूट आणि प्लेसूट्स -जंपसूट आणि प्लेसूट्स देखील खूप पसंत केले जातात.दिसण्यात देखील हे खूप स्टाईलिश लूक देतात.परिधान करायला देखील सहज आणि आरामदायी आहे.
 
5 भारतीय कुर्ती -आपण पारंपरिक ड्रेस परिधान करण्याची आवड ठेवता तर आपण भारतीय कुर्तीसह घट्ट फिटिंगची लेगिंग आणि जीन्स घालून बघू शकता. हे देखील खूप स्टायलिश लूक देते.
 
6 स्कर्ट -महिलांच्या कपाटात त्यांच्या शरीराच्या आकाराच्या मानाने स्कर्ट असावे.आपण स्कर्ट ऑफिस, घरात, आउटिंगसाठी इत्यादी कोणत्याही प्रसंगासाठी परिधान केले जाऊ शकते.आणि स्टाईलिश दिसू शकता.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती