स्टायलिश वाईड लेग पँट्स

गुरूवार, 8 ऑक्टोबर 2015 (12:13 IST)
1970-80 च्या दशकात बेलबॉटम पँट प्रसिद्ध होत्या. या पँटचा भला मोठा बॉटम तेव्हा जाम ट्रेंडी दिसायचा. सध्याही अशाच प्रकारच्या पँट्स ट्रेंडमध्ये आहेत. वाईड लेग पँट्सची सध्या चांगलीच हवा आहे. या पँट्स आरामदायी, मोकळ्याढाकळ्या असण्यासोबतच कधीही आउटडेटेड होत नाहीत. त्यामुळेच अशा पँट्स घेणं फायद्याचं ठरतं. तुमचाही वॉर्डरोब अशाच एखाद्या वाईड लेग पँटने सजवा. पण या पँट्स खरेदी करताना तुमची उंची, वजन यांचाही विचार करावा लागतो. 
 
* प्रत्येक बॉडी शेपवर या पँट उठून दिसतात. तरीही त्या घेताना कंबर नीट तपासून घ्या. कंबर अरूंद असेल तर तुम्ही लो वेस्ट पँट घेऊ नका. लो वेस्ट पँटमुळे तुम्ही जास्त जाड दिसाल. या पँट्स घेताना कंबरेला नीट बसणारी पँटच निवडा. तसंच घातल्यावर ती सरळ रेषेत असू द्या. तुम्ही उंच आणि बारीक असाल तर लो वेस्ट पँट हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरेल. टँक टॉप किंवा फिगर ह¨गग टॉप घाला. यामुळे तुम्हाला परफेक्ट लूक मिळेल.
 
* ब्लॅक अँड व्हाईट हे रंग कायमच फॅशनमध्ये असतात. काळ्या किंवा पांढर्‍या रंगाची वाईड लेग पँट घ्यायची असेल तर शरीराचा कोणता भाग तुम्हाला सर्वात जास्त हायलाईट करायचा आहे ते ठरवा. तुम्हाला शरीराचा जो भाग हायलाईट करायचा असेल त्या भागात गडद रंगांचे किंवा पिंट्रचे कपडे घाला. सध्या पांढरा रंग ट्रेंडमध्ये आहे. तुम्हाला उन्हाळ्यात या पँट्स घालायच्या असतील तर केशरी, निळ्या, हिरव्या किंवा पेस्टल शेडमधली पँट निवडा. मोठे, बटबटीत पिंट्र्स प्रत्येकीलाच शोभून दिसत नाहीत. त्यामुळे शक्यतो बारीक पिंट्र असलेल्या पँट्स घ्या. 
 
* या पँट्ससोबत तुम्ही वेगवेगळे टॉप्स ट्राय करू शकता. क्रॉप टॉप, जॅकेट किंवा साधा शर्टही या पँटवर उठून दिसेल. ब्लेझर, ओव्हरकोट घालूनही तुम्ही स्टायलिश एक्स्पिरिमेंट करू शकता. या पँटवर फॉर्मल सिल्क शर्ट आणि ब्लेझर घातल्यास तुम्हाला परफेक्ट लूक मिळून जाईल. लूज टी शर्ट किंवा नीटेड जंपरसोबतही तुम्ही या पँट मॅच करू शकता. 
 
* उंची कमी असेल तर वाईड लेग पँट्ससोबत हाय हिल्स घाला. तुम्ही फ्लेअर्स किंवा फ्लोअर लेंग्थ पँट घालायचा विचार करत असाल तर त्यावर पॉईंटेड हिल्स छान दिसतील. तुम्हाला उंच टाचेच्या चपला आवडत नसतील तर मीडियम हिल्सही तुम्ही घालू शकता. उंच आणि सडपातळ मुलींनी हिल्स टाळायला हव्यात. हिल्समध्ये या मुली जास्तच उंच दिसतील. फॉर्मल लूक मिळवण्यासाठी या पँटवर फ्लॅट चप्पल किंवा बूट घालता येतील. पॉर्इंटेड किंवा पीप टोजही यावर उठून दिसतील.

वेबदुनिया वर वाचा