शिअर फॉर समर

उन्हाळत कॉटनच्या कपडय़ांशिवाय चैन पडत नाही. तुम्हीही ऑफिसमध्ये कॉटन, खादी घालून जाताय का? त्याच त्या कपडय़ांचा आणि लूकचा तुम्हाला कंटाळा आलाय का? मग तुमच्याकडे शिअर म्हणजे पारदर्शक कापडाचा ट्रेंडी पर्याय आहे. त्यामुळे कॉटन आणि खादी जरा बाजूला ठेवा आणि शिअर मटेरिअलच्या कपडय़ांमध्ये हटके दिसा.
 
* शिअर मटेरिअल पातळ आणि पारदर्शक असल्याने तुम्हाला थंडावा मिळतो. 
 
* जीन्स किंवा ऑफिस ट्राउझरसोबत तुम्ही शिअर मटेरिअलचा शर्ट कॅरी करू शकता. शिअरचा टॉप जीन्सवर तो खुलून दिसेल. व्हाईट बॉटम आणि शिअर टॉप यामुळे तुम्हाला ङ्खेमिनाईन लूक मिळून जाईल.
 
* ट्रान्स्परंट कुर्ती हा बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. ट्रान्स्परंट कुर्तीसोबत लेगिंग किंवा पलाझो पँट ट्राय करा. शिअरची स्ट्रेट कुर्ती असेल तर पलाझो, क्यूलॉटस् किंवा लूझ पँट बॉटम म्हणून निवडा. असिमेट्रिकल कुर्ती असेल तर सोबत ले¨गग ट्राय करा. 
 
* वेस्टर्न लूक हवा असेल किंवा एखाद्या पार्टीला जायचं असेल तर तुम्ही शिअरचा वन पीस घाला. या ड्रेसमध्ये तुमचं सौंदर्य खुलून दिसेल. इंडियन लूकसाठी तुम्ही शिअर स्ट्राईप्सवाली साडी ट्राय करू शकता. 

वेबदुनिया वर वाचा