लहान मुलांबरोबर हॉटेलिंग, नको रे बाबा!

सायली पहिल्या नंबरने उत्तीर्ण झाली तेव्हा तिच्या आई-वडिलांनी तिला हॉटेलमध्ये पार्टी देण्याचे ठरविले. पण सायलीने  हॉटेलमध्ये असा काही दंगा केला की आई-वडीलांची पार फजिती झाली. इतर लोकांसमोर त्यांना शरमिंदे व्हावे लागले. 

काही आई-वडील असेही असतात की मुलांनी हॉटेलमध्ये दंगा केला तर काहीच बोलत नाही. लहान आहे म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. काही पालकांना मुलांच्या वागणुकीची लाज वाटते. त्यामुळे ते कुठल्याही पार्टीत मुलांना घेऊन जाण्याचे टाळतात आणि त्यांनाघरीच ठेवतात.

मुलांना घरी ठेवणे हे ह्या प्रश्नाचे उत्तर नाही. खाली दिलेल्या काही बाबींकडे लक्ष दिलं तर तुम्ही मुलांना कुठल्याही पार्टीत घेऊन जाऊ शकता.

* तुम्ही घरीच अशी नियमावली बनवा. ज्यात टेबलवर बसून कसं जेवायला पाहिजे किंवा त्या वेळी कसं वागावं हे स्पष्ट केलेलं असेल.

* जोराने ढेकर देणे, जेवण खाली किंवा अंगावर सांडणे, बोटं चोखणे, ड्रिंक्स किंवा पाण्यात बुडबुडे तयार करणे या सवयींना घरीच रोखायला हवे.

* घरातच त्यांना कटलरीचा वापर कसा करावा हे शिकवायला पाहिजे. अनेकदा बाहेर गेल्यावर आई-वडील मुलांना सांगतात ते कळत नाही. कुठली वस्तू चमच्याने खावी व पिझ्झा फोर्क किंवा काट्याने न खाता हाताने खावा हे मुलांना घरीच समजावून सांगितले पाहिजे.

* आवाज न करत खाणे, टेबलावर कोपरे टिकवून बसणे या सवयी घरीच लावल्या पाहिजेत. काही मुलं प्लेटमध्ये उगाचच जास्त अन्न भरून घेतात. त ते खाल्लं जात नाही. वाया जातं. पण त्यांना नंतर रागावण्यापेक्षा आधीच त्याची जाणीव दिली पाहिजे.

वेबदुनिया वर वाचा