डोळ्यापासून गालापर्यंत गोल्डन गोल्डन.....

गोल्ड मेकअप हा जास्त भडक नसून साधा व सोबर दिसतो. त्याला आपण मॅट कलर सोबत देखील वापर करू शकता. गोल्डन मेकअप हा भारतीय स्त्रियांना जरा जास्तच खुलून दिसतो.      
तुम्ही करीत असलेला मेकअप हा उद्या पडद्याआड जाणार हे नक्की.... कारण महिलांच्या सौंदर्याच्या वृद्धीसाठी आज विविध सौंदर्य प्रसाधने बाजारात उपलब्ध झाली आहेत आणि भविष्यात उपलब्ध होत राहणारच. सौंदर्य खुलविण्यासाठी त्याच त्या गोष्टी वापरून तुम्हाला देखील कंटाळा आला असेलच. यात शंका नाही. याची काळजी सौंदर्यतज्ञ्ज घेत असून नवनवीन उत्पादने ते बाजारात आणत असतात. काही दिवसांपासून तुम्ही वापरत असलेल्या पिंक व ब्राऊन रंगाच्या लिपस्टिकचा तुम्हालाच काय ते उत्पादन करणार्‍या कंपनीला देखील कंटाळा आला आहे. त्यामुळे तुमच्या सौंदर्यमध्ये भर टाकण्यासाठी व आजच्या आधुनिक महिलांच्या आवडीनिवडी लक्षात घेता बाजारात नव्याने लाँच झालेला गोल्डन मेकअप हा नक्कीच लावण्यवती महिलांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.

ND
गोल्डन मेकअप हा पूर्वी देखील बॉलीवूड स्टार रेखापासून तर आताच्या मलाइका अरोरा खानपर्यंत तसेच हॉलिवूडमधील नावाजलेल्या हस्ती जेनिफर लोपेझ यांनी देखील वापरला आहे. जुन्या काळातील चित्रपट नवरंगमध्ये देखील संध्याच्या चेहऱ्यावर आपण पाहिला असेल. कुठलीही फॅशन म्हटली तर तिच्यामागे भूतकाळ असतो. नवीन वस्तू तयार करायची झाली तर तिच्यासाठी जुन्या वस्तूंपासून प्रेरणा घेतलेल्या असतात. गोल्ड लुकमधील महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवळपास सर्वच कपड्यांवर ते मॅच होते. गोल्ड मेकअप हा जास्त भडक नसून साधा व सोबर दिसतो. त्याला आपण मॅट कलर सोबत देखील वापर करू शकता. गोल्डन मेकअप हा भारतीय स्त्रियांना जरा जास्तच खुलून दिसतो. कारण भारतीयांची त्वचा ही थोडी पिवळसर आहे.

गोल्डन मेकअप करीत असताना त्याचा वापर त्वचेवर अतिशय हलक्या पद्धतीने केला पाहिजे. त्याचा पातळ लेप चेहर्‍यावर लावला पाहिजे जेणेकरून त्याचा चांगला इफेक्ट जाणवेल. तसेच नाजूक ओठांवर हलकासा लेप लावला तर गोल्ड लिपस्टिक म्हणून देखील त्याचा वापर होऊ शकतो. संध्याकाळच्या पार्ट्या तसेच लग्न समारंभ आदी कार्यक्रमांना देखील गोल्ड लुकमध्ये तुम्ही इतरांचे लक्ष तुमच्याकडे आकर्षित करू शकता. तुम्ही गोल्डन पावडरचा देखील वापर करून जाऊ शकता. काळा गाऊन, टॉपमिडी, घागरा ओढणी त्याचबरोबर साडीवर गोल्ड लूकमध्ये तुम्ही अधिक आकर्षक व सुंदर दिसू शकतात.