या पूर्वी अर्ज फी जमा करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2020 होती ती आता वाढवून 8 जानेवारी 2021 करण्यात आली आहे. त्याच बरोबर ऑनलाईन अर्ज आणि फी जमा केल्यावर अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2020 होती, जी आता वाढवून 11 जानेवारी 2021 करण्यात आली आहे.
या व्यतिरिक्त, आयोगाने नमूद केले आहे की जाहिरातीं मध्ये ऑनलाईन स्वरूपात अर्ज करताना पदव्युत्तर मध्ये मिळालेल्या गुंणांच्या टक्केवारीचा कॉलम होता. पण पदव्युत्तर मध्ये ग्रेड सिस्टम ने गुण दिले जातात ज्यामुळे ग्रेड सिस्टम असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यात अडचण येत होती, आता टक्केवारीसह ग्रेड भरण्याच्या पर्यायाला देखील जोडले गेले आहे.