सैन्य भरती रॅली 2020: भारतीय सैन्यात 8वी, 10वी, 12वी उत्तीर्ण तरुणांसाठी संधी
शुक्रवार, 18 डिसेंबर 2020 (09:16 IST)
भारतीय सैन्यात 8वी, 10वी, 12वी उत्तीर्ण तरुणांसाठी joinindianarmy.nic.in वर अर्ज करा.
भारतीय सेना गुजरातमधील विविध जिल्ह्यात भरती मेळाव्याचे आयोजन करत आहे. 8वी, 10 वी, 12 वी उत्तीर्ण तरुण या साठी या संकेत स्थळ www.joinindianarmy.nic.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2021 आहे. ही भरती शिपाई (जनरल ड्यूटी), शिपाई टेक्निकल, शिपाई टेक्निकल (एविएशन/एम्युनिशन), शिपाई ट्रेंड्समॅन, शिपाई क्लार्क, स्टोअर कीपर, नर्सिंग असिस्टंट या पदांसाठी होणार आहे.
या भरती मेळाव्याचे आयोजन 1 फेब्रुवारी 2021 ते 15 फेब्रुवारी 2021 च्या दरम्यान गुजरात जामनगर, पोरबंदर, राजकोट, भावनगर, जुनागढ, सुंदरनगर, कच्छ, गिर, सोमनाथ आणि बोताड, मोरबी, देवभूमी द्वारका आणि दीव (यूटी) मध्ये केले जाणार आहे. या रॅलीचे प्रवेशपत्र उमेदवारांच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर 22 जानेवारी 2021 ते 27 जानेवारी 2021 च्या दरम्यान पाठविले जातील. उमेदवारांनी प्रवेश पत्रावर दिलेल्या तारखेनुसारच रॅलीच्या स्थळी पोहोचावे.
पद आणि पात्रतेचा तपशील-
शिपाई - जनरल ड्यूटी
वय मर्यादा
वय वर्ष 17 ½ -21 वर्ष (ज्यांचा जन्म 1 ऑक्टोबर 99 ते 01 एप्रिल 2003 दरम्यान झाला असेल).किमान 45 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण आणि प्रत्येक विषयात 33 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
शिपाई टेक्निकल
वय मर्यादा-
वय वर्ष 17 ½ -23 वर्ष (जन्म 1 ऑक्टोबर 97 ते 01 एप्रिल 2003 दरम्यान झाला असेल).किमान 50 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण 12 वीत फिजिक्स, केमेस्ट्री, गणित आणि इंग्रजी विषय असणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक विषयात 40 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
शिपाई टेक्निकल (एविएशन, एम्यूनिशन एग्जामिनर)
वय मर्यादा-
वय वर्ष 17 ½ -23 वर्ष (जन्म 1 ऑक्टोबर 97 ते 01 एप्रिल 2003 दरम्यान झाला असेल).किमान 50 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण. 12 वीत फिजिक्स, केमेस्ट्री, गणित आणि इंग्रजी विषय असणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक विषयात 40 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
शिपाई नर्सिंग असिस्टंट
वय मर्यादा-
वय वर्ष 17 ½ -23 वर्ष (जन्म 1 ऑक्टोबर 97 ते 01 एप्रिल 2003 दरम्यान झाला असेल).किमान 50 टक्के गुणांसह विज्ञान विषयातून 12 वी उत्तीर्ण. 12 वीत केमेस्ट्री, फिजिक्स, बायो आणि इंग्रजी असणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक विषयात 40 टक्के गुण असणे आवश्यक आहे.