सैन्य भरती रॅली 2020 : भारतीय सैन्यात 10 वी पास शिपायांची भरती 7 जानेवारी पर्यंत अर्ज करा

सोमवार, 7 डिसेंबर 2020 (09:37 IST)
भारतीय सैन्याने आपल्या अधिकृत संकेत स्थळावर भरतीबाबत माहिती joinindianarmy.nic.in जाहीर केली आहे. ही सैन्य भरती रैली पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग आणि कालीमपोंग जिल्ह्यातील तरुणांसाठी आयोजित केली जाणार आहेत. या रैलीच्या माध्यमातून शिपाई (जनरल ड्यूटी) भरती केली जाणार आहे. 
 
भारतीय गुरखा तरुणांसाठी जारी केलेल्या अधिसूचनेत असे सांगितले आहेत की कोविड-19 ची स्थितीला लक्षात घेऊन सैन्य भरती रॅलीचे ठिकाण आणि तारीख तर दिल्या जातील. या रॅलीत सहभागी घेण्यास इच्छुक असलेल्या तरुणांना प्रथम www.joinindianarmy.nic.in या संकेत स्थळावर जाऊन नोंदणी करावी लागेल. नोंदणीची अंतिम तारीख 7 जानेवारी 2021 आहे.
 
शैक्षणिक पात्रता - 
किमान 45 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण.
 
वय मर्यादा -
या भरती साठी ते तरुण अर्ज करू शकतात ज्यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1999 ते 1 एप्रिल 2003 दरम्यान झालेला आहे.
 
उंची संबंधित योग्यता (किमान) 
लांबी - 157 सेमी, वजन - 48 किलो, छाती - 77 सेमी(फुगवून 82 सेमी). 
 
संपूर्ण सूचना वाचण्यासाठी अधिकृत संकेत स्थळावर क्लिक करा.
 
सर्वप्रथम शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) असेल. या मध्ये धाव, बीम, लॉंग जम्प, जिगजेग, बॅलन्स असेल. या नंतर रॅलीच्या ठिकाणीच उमेदवारांचे शारीरिक मोजमाप केले जाईल. या नंतर उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेण्यात येणार आहे. वैद्यकीय चाचणीत यशस्वी झालेल्या उमेदवारांना लेखी तपासणीसाठी बोलविण्यात येईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती