UPSC Recruitment 2020: केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा
मंगळवार, 15 डिसेंबर 2020 (08:45 IST)
यूपीएससी भरती 2020: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. एकूण रिक्त पदांची संख्या 34 आहे. लोकसेवा आयोगाने ज्या पदांसाठी अर्ज मागविले आहेत त्यामध्ये लीगल अडवायझर किंवा कायदेशीर सल्लागार, मेडिकल फिजिसिस्ट,पब्लिक प्रॉसिक्यूटर एनआयए आणि असिस्टंट इंजिनिअर किंवा सहाय्यक अभियंता(इलेक्ट्रिकल) अशी पदे आहे. UPSC च्या भरती साठी अर्ज करण्याचे इच्छुक आणि पात्र उमेदवार आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर upsc.gov.in जाऊन 31 डिसेंबर 2020 च्या पूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
रिक्त पदांचे तपशील -
1 - सहाय्यक कायदेशीर सल्लागार, ईडी, अर्थ मंत्रालय - एकूण 2 पदे.
या पदासाठी अर्जदाराकडे कायद्याची पदवी तसेच किमान तीन वर्षाचा गुन्हेगारी किंवा क्रिमिनल लॉ चा अनुभव असावा. किंवा कायद्याच्या पद्युत्तर पदवी सह एक वर्षांचा गुन्हेगारीमध्ये किंवा क्रिमिनल मध्ये काम करण्याचा अनुभव असावा.
वय मर्यादा - 40 वर्ष
2 मेडिकल फिजिसिस्ट, सफदरगंज हॉस्पिटल, दिल्ली - एकूण 4 पदे.
या पदासाठी, अर्जदाराकडे पोस्ट एमएससी डिप्लोमा रेडिओलॉजी किंवा मेडिकल फिजिक्स मध्ये असणे आवश्यक आहे तसेच संबंधित शाखेमध्ये किमान कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेमधून 12 महिन्याची इंटर्नशिप असणे आवश्यक आहे.
वय वर्ष -35 वर्ष
3 - असिस्टंट किंवा सहाय्यक अभियंता (इलेक्ट्रिकल), नवी दिल्ली महानगरपालिका - एकूण 18 पदे.
सहाय्यक अभियंता साठी अर्जदाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी तसेच संबंधित क्षेत्रात किमान एक वर्षाचा काम करण्याचा अनुभव असावा.
वय मर्यादा- 30 वर्ष.
इतर पदांच्या तपशील आणि माहिती साठी येथे क्लिक करा.