उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने (UPPSC) ने राज्यातील विविध विभागांमध्ये 328 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मंगळवार पासून उमेदवारांनी नवीन नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी सुरुवात केली आहे. आयोगाकडून 328 विविध पदांसाठी केवळ ऑनलाईन अर्जच घेतले जात आहे. आयोगाकडून जाहीर केलेल्या जाहिरातींमध्ये उत्तर प्रदेश गृह (पोलीस) विभागात (रेडिओ सेवेत) सहाय्यक रेडिओ अधिकाऱ्यांची 2 पदे, उच्च शिक्षण विभागातील विविध विषयांत सहाय्यक प्राध्यापकांची 128 पदे, पीडब्ल्यू मधील सहाय्यक आर्किटेक्ट्ची -3 पदे, वैद्यकीय शिक्षण विभागात (अॅलोपॅथी) मध्ये 61 पदे, प्रशासकीय सुधारणा संचालनालयातील संशोधन अधिकाऱ्याची -4 पदे, उत्तर प्रदेश वैद्यकीय शिक्षण (होमिओपॅथी)-130 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.