NWDA Recruitment 2020: सहाय्यक अभियंतासाठी त्वरा अर्ज करा

शनिवार, 21 नोव्हेंबर 2020 (11:28 IST)
राष्ट्रीय जल विकास एजन्सी (एनडब्ल्यूडीए) भरती 2020: केंद्र सरकार मध्ये अभियांत्रिकीची नोकरी शोधणाऱ्या लोकांसाठी सहाय्यक अभियंतासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार सहाय्यक अभियंताच्या भरतीसाठी 31 डिसेंबर 2020 पूर्वी अर्ज करू शकतात.

NWDA नी रोजगार माहिती सहाय्यक अभियंताच्या पदाच्या भरतीसाठी 4 नोव्हेंबर रोजी जाहीर केली आहे. उमेदवारांना या साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ही रिक्त जागा 5 पदांसाठी आहे. भरती अधिसूचनेनुसार, ऑनलाईन लिंक 16 नोव्हेंबर 2020 पासूनच सक्रिय करण्यात आली आहे आणि याला 31 डिसेंबर रोजी बंद करण्यात येणार आहेत.
 
राष्ट्रीय जल विकास संस्था (NWDA) थेट भरती तत्त्वावर उमेदवारांची भरती करणार आहे. 
 
पात्रता : 1 उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल अभियांत्रिकीची पदवी घेतली पाहिजे.
2 वय मर्यादा : 21 ते 27 वर्षाच्या दरम्यान असावी.
3 पगार - 44900 रुपये - 142,400 रुपये.

निवड प्रक्रिया - 
एनडब्ल्यूडीए भरती प्रक्रिया चाचणी / मुलाखतीवर आधारित असेल.
 
अर्ज कसा करावा -
इच्छुक उमेदवारांनी 31 डिसेंबर किंवा त्यापूर्वी विहित केलेल्या अर्जाचा नमुन्या द्वारे राष्ट्रीय जल विकास एजेन्सी(NWDA) भरती अधिसूचना 2020 साठी अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेत स्थळ- nwda.gov.in वर भेट देऊ शकता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती