सरकारी नोकरी 2020 : देशभरात सरकारी नोकऱ्यांमध्ये अनेक पद रिक्त आहेत.
BEL - देशातील नवरत्न कंपनींमधील या एका कंपनीत नोकरी करण्याची उत्तम संधी समोर आली आहे. बीईएल भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ने अनेक पदांसाठी अर्ज मागविले आहेत इच्छुक उमेदवार 25 नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात. विशेष म्हणजे की उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रता आणि मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. म्हणजेच कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. मग उशीर कसला त्वरित अर्ज करा.
*********
दिल्ली एनसीआर मध्ये कनिष्ठ अभियंतांची भरती सुरू आहे. इच्छुक उमेदवार 04 डिसेंबर 2020 पर्यंत अर्ज करू शकतात. 28 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला कोणत्याही प्रकाराची लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही, केवळ मुलाखतीच्या आधारेच निवड केली जाणार आहे. त्वरा अर्ज करा.
*********
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (NICL) मध्ये दहावी पास उमेदवारांसाठी रिक्तता आहे. एजेंटच्या रिक्त पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट किंवा संकेत स्थळाच्या मार्फत ऑनलाइन अर्ज करू शकतात. 31 डिसेंबर 2020 पर्यंत किंवा त्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य आहे. उमेदवारांना कोणत्याही प्रकाराची अर्ज फी भरावी लागणार नाही. लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
Indian Coast Guard Vacancy 2021: इंडियन कोस्ट गार्डमध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या तरुणांसाठी नोकऱ्या निघाल्या आहेत. नाविकांच्या 50 रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या नोकरी साठी उमेदवार 7 डिसेंबर 2020 पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी कोणतीही अर्ज फी आकाराली जाणार नाही. लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणीच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येईल.