कोणत्याही देशासाठी ऊर्जा महत्त्वाची गरज आहे. देशाचा विकास ऊर्जेच्या नियोजनावर अवलंबून असतो.
ऊर्जेचा योग्य पद्धतीने वापर न केल्यास पर्यावरणावर त्याचा परिणाम होतो. म्हणूनच पर्यावरण आणि ऊर्जा ही दोन अशी क्षेत्रे आहेत जेथे करिअरची मोठी संधी उपलब्ध आहे. काय आहे ही संधी, कुठला अभ्यास त्यासाठी करायचा, कोणत्या प्रकारच्या नोकर्या मिळतात पाहू...
आवश्यक कौशल्ये
ज्यांना पर्यावरणात आणि ऊर्जा क्षेत्रात करिअर करायचं त्यांना पुढील कौशल्ये आत्मसात करावी लागतील -
व्यवस्थापन कौशल्य, तांत्रिक कौशल्ये, संशोधन, समस्या सोडवण्याचे कौशल्य, कटिबद्धता, झोकून देण्याची
वृत्ती, मेहनत, नेतृत्व कौशल्य.
पात्रता
उमेदवार ऊर्जा आणि पर्यावरण क्षेत्रात पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम करता येईल.
पदवीपूर्व अभ्यासक्रम : विज्ञान शाखेतून किमान 50 ते 60 टक्के गुणांनी बारावी उत्तीर्ण
पदव्युत्तर अभ्यासक्रम : विज्ञान किंवा अभियांत्रिकी शाखेतून किमान 50 किंवा 60 टक्के गुणांनी 12 वी उत्तीर्ण
जॉब प्रोफाइल
ऊर्जा किंवा पर्यावरणसंबंधी अभ्यासक्रमची पदवी असेल तर अनेक खासगी, सरकारी कंपन्यांमध्ये नोकरी
मिळू शकेल. या शाखांमध्ये पदव्युत्तर कोर्स केल्यानंतर पीएचडी देखील करता येईल.
या शाखांमधील जॉब प्रोफाईल अशी असेल - एन्व्हायर्नमेंटल स्पेशालिस्ट, एनर्जी मॅनेजर, रिसर्च