विलासराव देशुख यांच्यावर बायोपिक काढणे सोपे नाही

'माझ्या वडिलांचा सरपंच ते मुख्यमंत्री हा प्रवास थक्क करणारा होता. बर्‍याच लोकांनी त्यांच्या आयुष्यावर लिखाण केले आहे, त्यांच्या आयुष्यातील घटनांवर कथा लिहिल आहेत. परंतु त्यांच्यावर चित्रपट काढायचे इतके सोपे नाही' असे मत दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा आणि अभिनेता रितेश देशमुख याने व्यक्त केले आहे. 
 
रितेश त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र हे. 'बागी 3' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या कार्यक्रमादरम्यान त्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यापैकी एक प्रश्न होता तो म्हणजे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाशी संबंधित. त्यावर रितेश म्हणाला की, माझ्या वडिलांच्या आयुष्यावर चित्रपट यावा असे मलाही वाटते पण योग्य वेळ आणि चांगली पटकथा महत्त्वाची आहे, मी योग्य वेळ आणि पटकथेची वाट पाहत आहे'.
 
एखाद्या चित्रपटाची निर्मिती करणे सोपे नसते. विलासराव यांच्यावर चित्रपट म्हणजे तो माझ्या हृदयाच्या जवळचा विषय असणार आहे. यावेळी भावनिक होऊन चालणार नाही. दोन्ही बाजूचा विचार करावा लागेल. मी त्यांच्यावर चित्रपट काढला तर लोक म्हणतील मी केवळ त्यांची चांगली बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि इतर कोणी त्यांच्या आयुष्यावर चित्रपट काढला तर मला त्यांच्यातील काही गोष्टी पटणार नाहीत. त्यामुळे दोन्हीबाजूंचा विचार करून चित्रपटाची निर्मिती करावी लागेल', असेही रितेश म्हणाला.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती