वस्तू आणि सेवा कराची अर्थातच GSTची सुधारित आवृत्ती येत्या एप्रिलपासून लागू केली जाईल, अशी घोषणा अर्थसंकल्पी भाषणादरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत केली. ही प्रणाली सुधारित आणि सुटसुटीत असेल असे देखील सांगण्यात आले.
आतापर्यंत आपल्याला नवीन 16 लाख करदाते मिळाले असल्याचे माहिती देखील सीतारामन यांनी दिली. जीएसटीमधील कपातीमुळे ग्राहकांचे जवळपास 1 लाख कोटी वाचले असा दावा सीतारामन यांनी केला. जीएसटी कपातीमुळे दरमहा एका कुटुंबाची 4 टक्के बचत झाल्याची त्या म्हणाल्या. जीएसटीने देशाला एक केले कारण वन टॅक्स वन नेशनची संकल्पना जीएसटीने दृढ झाली. वस्तूंवरील कर कमी झाला, लघू आणि मध्यम उद्योगांना फायदा झाला.