Canara Bank SO Recruitment 2020 विशेषज्ञ अधिकारी पदांसाठी भरती सुरू
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020 (10:02 IST)
कॅनरा बँकेने विशेषज्ञ अधिकाऱ्यांच्या पदासाठी रिक्त जागा काढली आहेत. पदवीधरांना बँकेत अधिकारी होण्याची ही उत्तम संधी आहे.
अभियांत्रिकी, लॉ, सीए, बीए, एमए, बीएससी, एमएससी करणाऱ्या तरुणांना बँकेत अधिकारी होण्याची चांगली संधी आहे. कॅनरा बँकेने स्पेशालिस्ट ऑफिसर्सची शेकडो पदे रिक्त केली आहेत.
या रिक्त पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. कॅनरा बँकेच्या अधिकृत संकेत स्थळाच्या canarabank.com माध्यमाने ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली गेली आहे.
पदांचा तपशील -
* बॅकअप ऍडमिनिस्ट्रेटर किंवा प्रशासक - एकूण 4 पदे.
* ईटीएल स्पेशालिस्ट - एकूण 5 पदे.
* बीआय स्पेशालिस्ट - एकूण 5 पदे.
* अँटीव्हायरस ऍडमिनिस्ट्रेटर - एकूण 5 पदे.
* नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर - एकूण 10 पदे.
* डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर - एकूण 12 पदे.
* डेव्हलपर/प्रोग्रॅमर्स - एकूण 25 पदे.
* सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटर - एकूण 21 पदे.
* एसओसी अनॅलिस्ट किंवा विश्लेषक - एकूण 4 पदे.
* मॅनेजर(लॉ) -एकूण 43 पदे.
* कॉस्ट अकाउंटेंट- एकूण 1 पदे.
* चार्टर्ड अकाउंटेंट - एकूण 20 पदे.
* मॅनेजर(फायनॅन्स) - एकूण 21 पदे.
* इन्फॉर्मेशन सेक्युरिटी अनॅलिस्ट - एकूण 4 पदे.
* एथिकल हॅकर्स अँड पेनिट्रेशन टेस्टर्स - एकूण 2 पदे.
* सायबर फॉरेन्सिक अनॅलिस्ट - एकूण 2 पदे.
* डेटा मायनिंग तज्ज्ञ - एकूण 2 पदे.
* OFSSA ऍडमिनिस्ट्रेटर -एकूण 2 पदे.
* OFSS टेक्नो फंक्शनल - एकूण 5 पदे.
* बेस 24 ऍडमिनिस्ट्रेटर - एकूण 2 पदे.
* स्टोरेज ऍडमिनिस्ट्रेटर - एकूण 4 पदे.
* मिडेलवेयर ऍडमिनिस्ट्रेटर - एकूण 5 पदे.
* डेटा अनॅलिस्ट - एकूण 2 पदे.
* मॅनेजर -एकूण 13 पदे.
* सीनिअर मॅनेजर - एकूण 1 पदे.
* एकूण पदांची संख्या - 220
आवश्यक पात्रता -
वेगवेगळ्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि किमान व कमाल वय मर्यादा वेग वेगळ्या आहेत. याची सविस्तार माहिती पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवू शकता.
अर्जाची माहिती -
उमेदवाराला कॅनरा बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावयाचे आहे. पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रारंभ तारीख - 25 नोव्हेंबर 2020 पासून
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख - 15 डिसेंबर 2020
अर्ज फी -
सामान्य/जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस साठी - 600 रुपये
एससी, एसटी आणि दिव्यांग लोकांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
निवड प्रक्रिया -
ऑनलाईन चाचणी व जीडी आणि मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल.