लोकसेवा आयोग नोकरीची संधी देत आहे, प्राध्यापक पदा साठी अर्ज करा

बुधवार, 23 सप्टेंबर 2020 (13:47 IST)
बिहार लोकसेवा आयोगाने विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (प्रावैधिकी विभाग), बिहार अंतर्गत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये सह प्राध्यापकाच्या रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. पात्र उमेदवार जे या पदांवर नोकरी मिळवायची इच्छा बाळगतात, ते 22 सप्टेंबर 2020 ते 20 ऑक्टोबर 2020 पर्यंत या भरती साठी अर्ज करू शकतात. नोंदणी करण्यापूर्वी अर्जदाराने अधिकृत बातमी किंवा अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन अधिसूचना वाचावी.
 
महत्त्वाची तारीख - 
अधिसूचना जारी करण्याची तारीख: 21 सप्टेंबर 2020
अर्ज सादर करण्यासाठी प्रारंभ तारीख: 22 सप्टेंबर, 2020
अर्ज भरण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2020
अर्जाची हार्ड कॉपी जमा करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर, 2020
 
पोस्ट तपशील -
पदाचे नाव- सह-प्राध्यापक (गणित)
पदांची संख्या- एकूण 07 पदे
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी पुढील सूचना वाचा.
वय श्रेणी - या पदांसाठी अर्ज करणाऱ्यांचे किमान वय वर्षे 30 पदानुसार निश्चित केली आहे.
अर्ज प्रक्रिया - उमेदवार ऑनलाईनच्या माध्यमाने अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अधिसूचना डाउनलोड करून वाचाव्या लागणार. 
अर्ज करण्याची शेवटची मुदत 20 ऑक्टोबर 2020 पर्यंत निर्धारित वेळेतच मान्य केले जाणार. कोणत्याही प्रकाराची त्रुटी आढळल्यास अर्ज पत्रक रद्द केले जातील.
निवड प्रक्रिया - उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
 
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती