काय खरंच ॐ उच्चारण केल्याने धबधब्यातील पाण्याचा फवारा उडतो...

ॐ शब्दात अपार शक्ती असून याचे उच्चारण केल्याने आपल्याला मानसिक व शारीरिक आरोग्य सुख मिळतं. याचा जप केल्याने ईश्वर प्राप्ती होते. अशात ॐ शब्दाच्या अश्याच एका चमत्कारी शक्तीचा दावा करत असलेला 
 
व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा धबधबा थायलंडमध्ये असून येथे ॐ शब्द उच्चारित केल्यावर फवारा उडतो असे सांगण्यात येत आहे.
 
काय आहे या व्हायरल व्हिडिओत?
 
व्हायरल व्हिडिओत एक मुलगी जेव्हा माइकमध्ये ॐ उच्चारण करते तेव्हा पाण्याचा फवारा उडतो. फवारा जवळच्या पर्वतावरून निघून जातो. या कॅप्शनसह व्हिडिओ शेअर केला जात आहे:
 
‘थायलंडमध्ये एका पर्वताखाली एक धबधब्याच्या बाजूच्या पर्वतावर ओम् (ॐ) शब्दाचा उच्चारण करत पाण्याचा फवारा बनून पर्वताहून अधिक उडतो... हे एखाद्या बौद्ध साधू संप्रदायाद्वारे निर्मित आहे.. हे कसं घडतं हे कळत नाही? पाण्याचं वजन+गुरुत्वाकर्षणाहून इतक्या उंचीवर पाणी केवळ आवाजाच्या तरंगातून कशा प्रकारे उडू शकतं ? हे एखादा वैज्ञानिकाचं सांगू शकतो...हे जाणून घेण्यात मला अत्यंत रस आहे.. कारण केवळ ॐ उच्चारण केल्यावरच असं घडतं!! हा विचित्र अजुबा आहे...अनेक भारतीय लोकांनी हे करून बघितले आहे...जय हिंद’
 
 
काय आहे खरं?
 
या व्हायरल व्हिडिओची तपासणीसाठी आम्ही सर्वात आधी व्हिडिओचा स्क्रीनशॉट गूगल रिव्हर्स इमेजवर सर्च केल्यावर तिथे चीनच्या एका साईटवर हा व्हिडिओ सापडला. चिनी भाषेचं ज्ञान नसल्यामुळे आम्ही गूगल ट्रांसलेटची मदत घेतली, ज्यात माहीत पडले की हा फवारा आवाजामुळे उडतो. आवाज जितका मोठा फवारा तेवढा उंच.
 
मग आम्ही fountain आणि voice कीवर्ड्ससह गूगल सर्च केलं, तर आम्हाला New China TV चा एक व्हिडिओ सापडला, ज्यात माहीत पडले की हा व्हिडिओ थायलंडचा नसून चीनचा आहे. हा व्हिडिओ उत्तरी चीनच्या शान्शी प्रांताच्या कँगशेन पर्वताचा आहे.
तपासणीत आम्हाला Himalaya Music Fountain चे व्हिडिओज देखील सापडले, ज्यात आवाजामुळे फवारा उडण्याची तकनीक कळून आली.
 
आपण माइकमध्ये ओरडल्यावर, आवाज सिग्नलमध्ये परिवर्तित होते आणि कंट्रोल सिस्टममध्ये पाठवण्यात येते, नंतर पाण्याचा फवारा उडतो. याला शाउट फाऊंटन असे म्हणतात. चीनमध्ये अशा प्रकाराचे अनेक फवारे आहेत.
 
आमच्या तपासणीत व्हायरल व्हिडिओत करण्यात आलेले दावे खोटे ठरले.
 
* व्हिडिओ थायलंडचा नसून चीनचा आहे.
* फवारा केवळ ॐ उच्चारणाने नव्हे तर कोणत्या प्रकाराच्या आवाजामुळे उडतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती