सोशल मीडियावर आजीचा गंमतीशीर व्हिडीओ व्हायरल

शनिवार, 13 ऑक्टोबर 2018 (20:24 IST)
सोशल मीडियावर सध्या गंमतीशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक आज्जी अगदी टीव्ही मालिकेत घुसली आहे. हा व्हिडिओ नक्की कुठचा किंवा कधीचा हे कळत नाही. पण या व्हिडिओमुळे प्रत्येकाला आपल्या घरातील आजी किंवा आई आठवल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडिओत ही आजी एक मालिका पाहत आहे. या मालिकेत ती एवढी गुंतली आहे की, ती त्या मालिकेतील कॅरेक्टरशी संवाद साधत आहे. मालिकेतील गोष्टींवर रिअॅक्ट होताना दिसत आहे. असं आपण अनेकदा आपल्या आईला किंवा आजीला पाहिलं असेल. 
 
हा व्हिडिओ खूप मजेशीर आहे. महत्वाची बाब म्हणजे आजी हातातील वॉकर घेऊन रिअॅक्ट होताना दिसत आहे. या व्हिडिओला युट्यूबवर खूप पसंती मिळत आहे. तसेच हा व्हिडिओ फेसबुकवर देखील नेटीझन्स शेअर करून आजीला आठवत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती