महाराष्ट्रात देशातील पहिले डिजिटल क्राईम युनिट

देशात प्रथमच  लंडन मेट्रोपॉलिटन पोलिसच्या धर्तीवर महाराष्ट्रात देशातील पहिले डिजिटल क्राईम युनिट  कार्यान्वित केले आहे.  कॉपीराईटच्या गोरख धंद्याला आळा घालण्यासाठी हे युनिट सुरु केले आहे.  चित्रपट क्षेत्राप्रमाणेच संशोधन, उद्योग, डिजिटल कंपन्या या क्षेत्रालाही दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या संख्येत आर्थिक फटका बसत असतो त्यामुळे फार मोठे नुकसान तर होतेच मात्र हे धंदे करणारे पकडले जात नाहीत आणि तेच याचा फायदा उचलतात. त्यामुळे आता नवीन सेलला मोठे महत्वप्राप्त झाले आहे.  कॉपीराईट हा शब्द आपल्याला माहीत आहे मात्र त्यातील नुकसान आणि आर्थिक फटका कसा बसतो हे अनेकांना माहित नाही.  चोरीचा अर्थात मसुदा चोरी  हा काळा धंदा वरचेवर सर्वच क्षेत्रांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हे युनिट तयार झाले आहे. हे नवीन युनिट सायबर सेलच्या मुख्यालयात हा सेल कार्यान्वित करण्यात आहे. आत या नवीन युनिटअंतर्गत संशयास्पद संकेतस्थळांवर लक्ष  ठेवण्यात येत आहे. आजअखेर या युनिटकडून कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन करणार्‍या शंभरहून अधिक संकेतस्थळांना कारवाईबाबतच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत.

कॉपीराईटच्या काळ्या धंद्याला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबर अंतर्गत कार्यान्वित करण्यात आलेले डिजिटल क्राईम युनिट हे देशातील पहिले युनिट आहे.  युनिट मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे कार्यान्वित करण्यात आले आहे.संशोधन, चित्रपट, डिजिटल हाऊस याठिकाणी मोठ्या प्रमाणात कॉपीराईटचे प्रकार घडतात. त्यातून अनेकांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळत नाही तर आर्थिक नुकसान सोसावे लागते आता या सर्व चोरीला मोठा आळा बसला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती