रिलायन्स जिओने ४ जी मोबाईल फोनची पुन्हा एकदा विक्री सुरु केली आहे. सुरुवातीला हा फोन बुकींग करुनही काही लोकांना मिळाला होता. आता www.jio.com या कंपनी अधिकृत संकेतस्थळावरून हा मोबाईल विकत घेता येईल. जिओचा ४ जी फीचर फोन विकत घेण्यासाठी ग्राहकांना १५०० रूपये अनामत रक्कम ठेवावी लागणार आहे. १५०० रूपयांची ही अनामत रक्कम तीन वर्षानंतर ग्राहकांना परत मिळणार आहे. त्यामुळे हा फोन मोफत मिळणार आहे.
- जिओच्या www.jio.com या संकेतस्थळावर गेल्यावर नाऊ ऑर्डर या ऑप्शनवर क्लिक करा. क्लिक केल्यावर मोबाईल नंबर टाकून सबमिटवर क्लिक करा.
- मोबाईल नंबर सबमिट केल्यानंतर डिटेल्स मागितले जाईल. त्या डिटेल्समध्ये पोस्टल कोड टाका.
- जर दुसऱ्या नावांनी मोबाईल घ्यायचे असतील तर अॅड न्यू या ऑप्शनवर क्लिक करा. दुसरा मोबाईल नंबर आणि पोस्टल कोड टाकू शकता. त्यानंतर प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करा.
- प्रोसीड केल्यानंतर मोबाईलसाठी द्यावी लागणारे १५०० रूपये भरा. पे या ऑप्शनवर क्लिक करा आणि पैसे भरा.
- पेमेंट प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मोबाईलवर तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज येईल. त्यानंतर काही दिवसात जिओचा ४जी फीचर फोन मिळणार आहे.