पुरुष तर पुरुष आता महिलांच्या मद्य सेवनाने यकृत विकारात १२ टक्क्यांनी वाढ

शनिवार, 20 एप्रिल 2019 (10:28 IST)
महिलांमधील मद्यपानाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मागील दहा वर्षांत त्यांच्या यकृत विकारातही जवळपास १२ टक्क्याने वाढ झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये लहान शहरांच्या तुलनेत मोठ्या मेट्रो शहरांमध्ये हे प्रमाण वाढले असून प्रश्न गंभीर बनला आहे. जागतिक यकृत दिनानिमित्त हे आकडेवारी प्रसिद्ध झाली असून  महिलांसाठी निश्चितच चिंताजनक बाब आहे. यामध्ये प्रामुख्याने शहरी भागातील बदलती जीवनशैली, स्थुलता, फास्ट फूडचा अतिरेक, तर आहाराच्या अनियमित वेळा आणि मुख्य म्हणजे व्यसनाधिनता आणि व्यायामाचा अभाव या कारणांमुळे विविध आजार वाढत आहेत. यकृताशी संबंधित (लिव्हर) आजाराच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. त्यात महिलांचे प्रमाणदेखील गंभीर प्रकारे वाढले असून आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. 
 
मागील दहा वर्षांपूर्वी यकृत विकारग्रस्त प्रत्येक १०० रुग्णांमागे महिलांचे प्रमाण हे फक्त २ ते ५ टक्के होते. मात्र, हेच प्रमाण आता थेट १२ टक्क्यांपर्यंत जाऊन ठेपले आहे. यकृतामध्ये एखादी समस्या उद्भवली किंवा इजा झाली तर ते अवघ्या ४८ तासांत बरी होते. तसेच, ७० टक्क्यांपर्यंत झालेले नुकसानदेखील ३ आठवड्यांत पुनर्निर्मितीच्या क्षमतेमुळे भरून निघते. व्यसनाधिनता व बदललेल्या जीवनशैलीमुळे हे नुकसान ७० टक्क्यांवर गेले की समस्या सुरू होतात. त्यामुळे सर्वांनी आता व्यसनापासून अगदी दूर राहवे व्यायाम करावा आणि योग्य ते अन्न घ्यावे असे डॉक्टर म्हणतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती