जागतिक कामगार दिन : या होत्या कामगारांच्या मागण्या

शुक्रवार, 1 मे 2020 (05:55 IST)
1 मे रोजी मे दिन साजरा केला जातो. हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन म्हणून पाळला जातो. हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिनविशेष आहे. 
 
1 मे रोजी जगभरातील ८० हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो. हा दिवस प्राचीन युरोपातील वसंत दिनाच्या दिवशीच असतो. हा दिवस शिकागो मध्ये ४ मे १८८६ मध्ये घडलेल्या हेमार्केट घटनेच्या स्मरणार्थ जगभरातील समाजवादी, साम्यवादी आणि अराजकतावादी पक्ष साजरा करतात. 
 
औद्योगिक क्रांती झाल्यावर कामगारांना रोजगार मिळू लागला परंतू त्यांना कोणत्याही सुविधा न देता दिवसाला 14 तास राबवले जात होते. या विराधोता कामगार एकत्र आले आणि कामगार संघटनांची निर्मिती झाली. 
 
'मे दिन' हा १९ व्या शतकाच्या मध्यावर कामगार चळवळीतून सुरु झाला. ज्याची मुख्य मागणी 'आठ तासाच्या कामाच्या दिवसाची' होती. या व्यतिरिक्त कामगारांच्या प्रमुख मागण्या होत्या की स्त्रियांच्या कामावर मर्यादा, लहान मुलांना कामाला लावण्यास बंदी, साप्ताहीक सुट्टी, कामाच्या मोबदल्यात नगद, धोक्याच्या आणि रात्रीच्या कामसांठी विशेष नियम, समान कामासाठी समान वेतन आणि संघटना स्वातंत्र्य अशा काही मागण्यात केल्या गेल्या.
 
या संदर्भातील पहिली मागणी २१ एप्रिल १८५६ रोजी ऑस्ट्रेलियातील कामगारांकडून आली तेव्हापासून हा दिवस तेथे सुट्टी म्हणून जाहीर झाला. 
 
ऑस्ट्रेलियातील कामगारांच्या मार्गाने जात अमेरिका आणि कॅनडातील अराजाकातावादी संघटनांनी १ मे १८८६ रोजी मोर्चे आणि धरणे यांची मालिका सुरु केली. अशाच एका मोर्चाला पांगवताना ४ मे १८८६ रोजी शिकागो मध्ये सहा आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या क्रूरतेविरोधातील एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांवर बॉंब टाकला ज्यात ८ पोलिसांचा मृत्यू आणि ५० पोलीस जखमी झाले.
 
या घटनेच्या स्मरणार्थ १ मे १८९० रोजी आंतरराष्ट्रीय आंदोलनाचे आयोजन करण्याची मागणी रेमंड लेविन याने 'दुसऱ्या आंतरराष्ट्रीय'च्या १९८९ च्या पॅरीस परिषदेत केली. 
 
त्या परिषदेत १ मे १८९० हा जागतिक कामगार एकता दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित झाले. १८९१ च्या दुसऱ्या परिषदेत या कार्यक्रमाला औपचारिक रित्या प्रतीवार्षिक कार्यक्रम म्हणून मान्यता देण्यात आली. भारतातील प्रथम कामगार दिन चेन्नई येथे लेबर किसान पार्टी हिंदुस्थान या संघटनेद्वारे १ मे १९२३ रोजी पाळण्यात आला. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती