पेन्सिलच्या टोकावर महानायक अमिताभ बच्चन

मंगळवार, 25 ऑगस्ट 2015 (11:34 IST)
कलाकारावरील प्रेमापोटी त्याच्या आठवणी जपणे, आपल्याकडील एखाद्या महत्वाच्या वस्तूवर कलाकाराचा ऑटोग्राफ घेणे, भलेमोठे पोस्टर्स आपल्या खोलीत लावणे किंवा छायाचित्रांची कात्रणे जमा करणे, अशा विविध माध्यमातून प्रत्येक चाहता आपल्या आवडत्या कलाकारावरील प्रेम जपत असतो. 
 
सचिन सांधे या अशाच एका चाहत्याने आपल्या आवडत्या बॉलिवूड कलाकारावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी नवी शक्कल लढवली. या पठ्ठय़ाने बॉलिवूडच्या महानायकाची म्हणजेच अमिताभ बच्चन यांची छबी चक्क पेन्सिलच्या टोकावर कोरली आहे. सचिन सांधे हा शिल्पकार अगदी लहानपणापासून बिग बी यांचा चाहता राहिला आहे. सुक्ष्म-शिल्पकलेची कला अवगत असलेल्या सचिनने पेन्सिलच्या   टोकावर अमिताभ यांची छबी साकारली. सचिनला ही कलाकुसर करण्यास 8 तास लागले. त्यानंतर या सुक्ष्मशिल्पकलेचे छायाचित्र सचिनने ट्विटरवर अकाऊंटवरून शेअर केले. अमिताभ यांनी सचिनच्या कलेची दखल घेऊन त्याचे आभार व्यक्त केले आहेत 

वेबदुनिया वर वाचा